(Photo Source : https://www.facebook.com/shrianiruddhagurukshetrampathak/photos/)
बापूंनी आमच्यातला 'वादक' अचूक हेरला,
बापूंनी आमच्यातला 'वादक' अचूक हेरला,
आमच्यातली 'कला' ओळखून जल्लोष घडवला.
जल्लोष जल्लोष जल्लोष,
ह्याची खरी धुंधी,
बापूंच्या प्रेमाने नसानसांत भिनली.
निमित्त एकच,
'अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.
आमच्यातला कलाकाराला
'कलादालन' खुले झाले.
आयुष्याला नवीन दिशा,
दिशेला नवीन मार्ग मिळाला.
कला माणसाला जीवन जगायला शिकवते,
बापूंनी प्रत्यक्षात जीवन सजवायला शिकवले.
बापू आमच्या आयुष्यात,
सद्गुरु म्हणून लाभला.
तेथूनच आयुष्याच्या वळणाला,
सुंदर कलाटणी लाभली.
असा हा आमचा बापू,
नुसता आमचा बापच नाही.
तर आमचा खराखुरा,
'आप्त' म्हणून भेटला.
आमच्यातला सुप्त गुणांना,
भारीच वाव मिळाला.
कारण संगतीला अनिरुद्धाची,
नावच आयुष्यात उतरली.
असा हा आमचा बाप लईच भारी हायं!!!!!
म्हणूनच अनिरुद्धाची पोरं हुशार हायं!!!!!!
- अनुप्रिया आदित्य सावंत.
('अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.)
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.