ढोल माझी आवड. ढोल माझे प्रेम. ढोल माझा आनंद. ढोल माझा श्वास. ढोल पाहिले तरी अंगात वीरता येते. अंग शहारून जाते. ढोलाचा नादच भारी. आपणही कंबरेला ढोल बांधावा. बेभान होऊन वाजवावे. ढोलाचा टीपरूच हातात घेतल्यावर मनगटात जे बळ येते त्याची तुलना कोणत्या ताकदीशी होऊ शकत नाही, असे मला वाटते. माझे गाव पुणे. मला पुण्याला ढोल वाजवायला जायला मिळाव म्हणून कधी शिक्षणाचे निमित्त तर कधी नोकरीचे निमित्त करून तिथे जाता यावा ह्यासाठी माझी धडपड चाले.
मुंबईत नोकरी करत असताना मला interview चा कॉल आला. त्यांचे टेलीफोनिक आणि पर्सनल असे एक एक राउंड करत ५ व्या राउंडला फाईनल सिलेक्शन झाले. तुला ट्रेनिंग साठी १५ दिवस पुण्याला जावे लागेल. हे ऐकूनच खुश झाले होते. जॉब पेक्षा खरा आनंद यंदा पुण्याला जाऊन ढोल वाजवायला मिळेल हाच होता. गणेशोस्तव जवळ आलेला. मागच्या दोन वर्षापासून मी माझ्या पुण्याच्या ग्रुप मध्ये ढोल साठी येणार म्हणून त्यांना सांगून झाले होते पण त्या वर्षी जायला भेटल नाही म्हणून आता तरी स्वप्न पूर्ण होईल ह्या आशेत मी खूप खुश होते.
ट्रेनिंग साठी पुण्याला १५ दिवस जावे लागेल असे त्यांनी सांगितले. तसेच राहण्याची सोय न झाल्यास मला तसे ट्रेनिंग शेडूल करून देऊ असेही सांगितले गेले. सगळे फाईनल झाले आणि माझी आहे त्या जॉब मधून रीजाईन करण्यासाठी आणि तसेच पुण्याला जाऊन राहण्यासाठीची सर्व तयारी सुरु झाली. सर्व तयारी झाल्यावर मला त्या कंपनीतून फोन आला कि, ऑफर लेटर आपको आप इमेजिएट जोइन करणे के समय मिलेगा| सगळ काही झाल्यावर अचानक असा फोन गडबडून गेले. कारण हे शक्यच न्हवत. सद्गुरूंचा फोटो समोरच होता. रडले मी बापू जवळ म्हंटल मागच्या वर्षी पासून पुण्याला जायचे म्हणतेय ढोलसाठी, पण ह्याही वर्षी जाणे होत नाहीये बापू. जोब्चे मला काहीच वाटत न्हवते पण सगळ काही ढोल वाजवायला मिळण्यासाठी चाललेली खटाटोप होती.
मला अजूनही तो क्षण खूप छान आठवतोय. सद्गुरु जवळ रडत असताना अचानक त्याच क्षणी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मला बोलली, मला १ ते ६ हात ढोलचे हवे आहेत ते सांग ना! मी मनात बोलली, हि अशी का विचारतेय? एवढं कधी विचारलं नाही. आजच आणि तेही माझा नेमकं ढोलचे पुण्याला जाण्याचे कॅन्सल व्हावे तेव्हाच? तिला म्हंटल देते आणि फोन ठेवून सद्गुरुंकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा मला एवढा हसताना दिसला कि मी विचारात पडले. आणि पटकन ट्यूब पेटली बापूंकडे ढोल वाजवतात. तिला फोन केला आणि विचारल, मध्येच का विचारलस तू आणि कशासाठी? बोलली अगं हव होतं. ती पुढे बोलायचा आत मी तिला प्रश्न केला बापूंकडे ढोल चालू झालं का? तर बोलली हो. मी बोलली माझ्यासाठी विचार तर सांगितल फुल झाले आहेत; आता कोणाला घेत नाहीत. पुन्हा निराशा झाली माझी. कारण मला 'ढोल' चीच पडली होती. ढोल माझं passion. म्हंटल, ठीक आता काय करू असा बघून बापूकडे पाहिले पुन्हा बापू हसला.
ढोलमध्ये नवीन कोणाला घेत न्हवते. मला सांगितले गेले तू लेझीम मध्ये जा. मनात बोलली ठीक आहे, आपण लेझीम एन्जोय करून पाहू, नाराज नको व्हायला. आणि मी लेझीम खेळत असताना ते लेझीमच्या काउंटच्या ऐवजी मी हातातली लेझीम ढोलच्या टीपरु पकडल्यागत वाजवत सगळ लक्ष ढोलकडे. लेझीमची को-ओर्डीनेटर बोलली जायचं का तिथे? मनात म्हंटल हा, मी त्याचसाठी आहे. क्षणातच मला निरोप आला तुला बोलावलंय. आणि माझी ढोल मध्ये एन्ट्री पक्की झाली.
त्यातही मला ढोलमध्ये माझ्या सद्गुरुं समोर ढोल वाजवण्याची संधी आली. बापू जस-जसा जवळ येत होता धडधड वाढत होती. आगमनाच्या वेळेस ज्यावेळी आम्ही गुरुक्षेत्रमला सद्गुरुं समोर वादन करणार होतो, तेव्हा पुढे मला थांबायला सांगितलेले. तेव्हा अक्षरश त्याच्या समोर गेल्यावर खरच काही सुचत नाही हे खरं आहे. मी फक्त त्यालाच बघत होती. आणि त्यावेळी त्याने मला दोनही डोळे मिचकावून जी नजर दिली ती अफलातून होती. श्रीराम. आणि एवढा गोड हसला, जसा कि माझा बापू मला बोलला; झाली का तुझी इच्छा पूर्ण. श्रीराम! श्रीराम!!! श्रीराम!!!!! खूपच सॉलिड क्षणं होता तो माझ्या आयुष्यातला. सद्गुरुकृपेने मी अंबज्ञ आहे. विश्वासात भक्तीत मी कमी पडतेय पण तरीही माझा भार माझा अनिरुद्ध, माझा बाप उचलतोय. माझी फुल सेटिंग बापूने लावली अगदी १०८ टक्के. होळीच्या दिवशी साईनिवासला मी पोचतही न्हवते आणि मला बापूंच दर्शन मिळनहि शक्य न्हवत पण लास्ट रो मधून मला फर्स्ट रो मध्ये आणणारा माझा बाप, मला माझ्या आय लव यु ला, लव यु बाळा बोलला ह्या त्याच्या उत्तराने खरच अगदी १०८ टक्के माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या बापूचरणी अर्पण आहे. आणि हे सर्व तोच करून घेतो आणि तोच करतो. मला कुठून कसं आणलं, त्याला माझ्यासाठी किती कष्ट पडले हे तोच जाणतो.
जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित |
हे मात्र मी नक्की जाणीत | नाही तकरार राघवा ||
- अनुप्रिया आदित्य सावंत.
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.