Friday 21 August 2015

कविता #5 - शब्द आणि कविता



कोणी म्हणतं शब्दाला थोडी पोलीशिंग हवी. 
कोणी म्हणतं शब्दाची जुळवाजुळव हवी.
कविता हि कशी आतून जुळायला हवी,
पण आतून काय नि बाहेरून काय कळत नाही बुवा,
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

शब्दांच्या जूळवनेत बनते मोठे कोडं,
कोडांच्या कचाट्यात बसते शब्दांची दातखीळ,
शब्द जुळले नाही शब्दाला, तरी घेऊ थोडे कष्ट.
प्रेमाला कसे प्रेम जुळले कि झाले आमचे मस्त.
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

काना मात्रा उकार ह्याला नाही येत आकार.
वजाबाकी बेरीज करता गणिताचा होतो भोपळा.
गणिताचा पाढा नको, भोपळ्याची भाजी नको.
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

कवितेत येतो चंद्र, तारे, चांदणे,
मधेयचं भरतात कुठून तरी पाने, फुले, फळे.
शब्द येते, मन येते, येते मध्येच प्रेम पोवाडे.
चंद्राच्या ह्या प्रकाशात चमकते कसे चमचम, 
गफलत होते पक्की, नक्की काजवा कि चांदणं.
आहे काय नाही काय कळे काही प्रकार काय,
तरीही मी एक कविता करून पाहणार.
                      
                    - अनुप्रिया सावंत.

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.