Thursday 6 August 2015

कविता #3 - आयुष्यं... खरंच खूप छान असतं हे आयुष्यं!!!



आयुष्यं.. खरंच खूप छान असतं हे आयुष्यं.
कधी हसवतं, कधी रडवतं,
कधी स्वप्नांच्या धुंदीत स्वतःलाच फसवतं.
आयुष्यं हे असंच असतं.

पडलो धडपडलो, तरी स्वतःच उठायचं असतं.
जमल्यास दुसऱ्याच्या आधाराचा, 
आनंद होऊ पहायचं असतं.
आयुष्यं हे असंच जगायचं असतं.

येतात अनेक वादळे, चुकतात अनेक दिशा, 
प्रवाहाच्या उलट दिशेने पोहताना, लागते चाहूल संकटाची, 
आले संकट धावून म्हणून, आपलं पोहणं सोडायचं नसतं,
तर आयुष्यं हे असंच जगायचं असतं.

आपली सुखं अनुभवताना, 
दुसऱ्याच्या आधाराची निःस्वार्थ काठी होऊन पहावी.
स्वतःच सुखं शोधताना, 
दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊ पहावा.
आयुष्यं जगण्याची कला, 
अशीच अवगत करू पहावी.
आयुष्यं हे असंच असतं, 
आयुष्यं हे असंच जगायचं असतं.

ते नुसतं जगायचं नसतं तर 
प्रत्येक क्षणाला अनुभवायचं असतं.
परमेश्वराने दिलेली आयुष्याची अनमोल देणगी 
ही देतानाच भरभरून दिलेली असते.

संकटाचे बळ त्याने सोबतच दिलेले असते, 
फक्त ते स्वतः स्वतःचे अनुभवायचे असते.  
स्वतःचे स्वतःला ओळखताना, 
दुसऱ्यालाही ही आपलेसे करेल 
असा स्वतःचा आनंद त्यात असावा.

जगतानाचे आयुष्यं हे असेच 
आनंदातच जगायचं असतं.
आयुष्यं हे असंच असतं, 
आयुष्यं हे असंच जगायचं असतं.

                                          अनुप्रिया सावंत.

3 comments:

  1. आयुष्यावर अप्रतिम कविता लिहीली आहे आपण अनुप्रिया.
    जमल्यास दुसऱ्याच्या आधाराचा, आनंद होऊ पहायचं असतं.
    आयुष्यं हे असंच जगायचं असतं.
    आले संकट धावून म्हणून, आपलं पोहणं सोडायचं नसतं,
    तर आयुष्यं हे असंच जगायचं असतं.
    आपली सुखं अनुभवताना,
    दुसऱ्याच्या आधाराची निःस्वार्थ काठी होऊन पहावी.
    स्वतःच सुखं शोधताना,
    दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊ पहावा.
    आयुष्य जगण्याची नवीन कला , नवा द्रुष्टीकोन अवगत केल्याबद्द्ल धन्यवाद!!!

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!!

      Delete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.