Showing posts with label About Me. Show all posts
Showing posts with label About Me. Show all posts

Monday, 9 February 2015

माझे सद्गुरु

आयुष्याचं सोनं होतं म्हणजे नेमकं काय असतं ह्याची प्रत्यक्षात आलेली प्रचिती म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या सद्गुरूचे येणं.

प्रेम आणि पावित्र्याने प्रपंचास परमार्थाची उत्तम जोड देऊन आयुष्याचं सोनं करणारे माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू.
उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम वाचक, उत्तम कवी, नाटककार, मूर्तिकार, फोटोग्राफर, चित्रकार, नृत्य तसेच इतर अनेक कलागुणांनी सर्वसंपन्न असे सद्गुर अनिरुद्ध बापू  M. D. डॉक्टर आहे.
HE IS SIMPLY UNIQUE.

डॉक्टर असून देखील प्रत्येक गोष्टीची मुळ उकल आणि प्रत्येक गोष्टीचा मुळ गाभा ह्यांची त्यांना असलेली माहिती अचंबित करणारी आहे. बापू स्वतः अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची उत्तम सांगड घालून तसेच ते स्वतः आचरणात आणून आमच्याकडूनही करवून घेतात.  उत्तम शिक्षक कसा असावा हे डॉ. अनिरुद्ध (बापू) ह्यांच्याकडे पाहिल्यावर कळतेच.  प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळेल समजेल अश्या सोप्या भाषेत ते सांगतात. सर्व कलागुण संपन्न असूनही त्यास तोडीस तोड त्यांची मधुर वाणी, प्रेमळ, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, तसेच वेळप्रसंगी अत्यंत कठोर असा त्यांचा स्वभाव.

बापूंनी सहा ग्रंथ लिहले आहेत. त्यातील श्रीमदपुरुशार्थाचे तीन खंड म्हणजे मर्यादा पुरुषार्थ शिकविणारे पाठ्यपुस्तकच. "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक" हे माझ्या सद्गुरूचे ब्रीद वाक्य. हे तीन ग्रंथ जणू अवघाची संसार सुखाचा करण्यासाठीचे प्रॅक्टिकल ग्रंथच आहेत.
त्यानंतर 'रामरसायन' हा ग्रंथ - अत्यंत गोड मधूर असा आनंद देणारा.
'मातृवास्तल्य विन्दानाम' आणि 'मातृवास्तल्य उपनिषद' - गायत्रीमाता, महिषासुरमर्दिनी आणि अनसूयामाता यांचे आख्यान समाविष्ट.
तसेच, "तदात्मानम सृजाह्म्यम" आणि "आवाहन न जानामी" ही पुस्तके.
ह्याव्यतिरिक्त "दैनिक प्रत्यक्ष" मधील अग्रलेखांची मालिका तर भूत, भविष्य आणि वर्तमान ह्यांची ओळख करून देणारी, जाणीव करून देणारी, रहस्यमय तसेच ऐका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देऊन वसुंधरेवरचे अद्भुत रहस्य आणि सत्य उलगडून सांगणारे आहे.
माझे सद्गुरु अनिरुद्ध केवळ अध्यात्मिकच नाही तर समाजात, जगात, विश्वात घडणाऱ्या अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा आहे.  त्यांनी लिहिलेले 'तिसरे महायुध्द' हे वास्तववादी पुस्तक वाचल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चाललेल्या सद्य परिस्थितीतले घडामोडी आणि डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचा अभ्यास किती अचूक आहे ह्याची पदोपदी खात्री होते.  असं बरंच काही माझ्या सद्गुरुबद्दल सांगण्यासारखे आहे.  त्याचे वर्णन करण्यास शब्दांना सीमाही नाही आणि शब्दही अपुरे पडतील. 

असा माझा मित्र, सखा, मायबाप, माझा सद्गुरु डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी माझ्या आयुष्यात सद्गुरु रूपाने लाभला. ह्याहून सुंदर गोष्ट असूच शकत नाही.

अनुप्रिया सावंत.

मी कोण - मी आहे




मी सौ. अनुप्रिया आदित्य सावंत.

     राईट अबाउट "मायसेल्फ" असा प्रश्न आला कि अक्षरशः भीतीने गाळण उडायची.  मी कोण? म्हणजे काय असत?  हे कधी ना समजले, नाही लिहिता आले.  पुस्तकात जे आहे ते छापायचे एवढेच माहित.  त्या पलीकडे केव्हाही काहीही उमगले नव्हते.

     पण... आज जर मला कोणी "माझ्याबद्दल" विचारले.....
तर माझे उत्तर एकच असेल.....

मी आहे !!!

'माझे अस्तित्व आहे' ही माझी पहिली ओळख आहे.  कारण दुनियाच्या भुलभुलैय्यात आज प्रत्येक जण आपले स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही धडपड करीत असतो.  पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की "माझे अस्तित्व म्हणजे काय"? मी कमावत असलेला पैसा माझे अस्तित्व आहे की मी घेतलेले शिक्षण म्हणजे माझे अस्तित्व आहे. 

     तर उत्तर येईल नाही. मग तरीही हे मिळविण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो. व्यावहारीक दृष्ट्या ते अगदी बरोबरही आहे....पण मग माझे अस्तित्व काय आणि ते कस जपता येईल याचा विचार केला पाहीजे.

     म्हणूनच माझे सदगुरु अनिरुद्ध बापू अगदी सोप्प्या शब्दात सांगतात की "मी आहे..." "आय एम" "मैं हू" हे शब्द माझे अस्तित्व दर्शविणारे आहे. "मी आहे..." ही जाणिव आधी स्वतःला झाल्यानंतर मी कशी आहे? माझ्याकडे काय आहे? हे प्रश्न आपण स्वतःला विचारु शकतो आणि ते प्रश्न विचारल्यावर मला मिळालेले उत्तर म्हणजे "अनुप्रिया".

     हो अनुप्रिया म्हणजे 'प्रिय मुलगी'. Beloved Daughter.
माझ्या वडीलांची अर्थात माझ्या Dad ची मी प्रिय मुलगी आहे...."मी अनुप्रिया आहे" आणि हेच माझे मूळ अस्तित्व आहे.  म्हणूनच मी या ब्लॉगचे नावच "अनुप्रिया" ठेवले आहे जे माझे ही नाव आहे.

       नावात काय आहे... असे शेक्सपिअर म्हणतो... माझ्या नावात माझे तरी अस्तित्व आहे, असे मला वाटते.

         आणि ह्या अस्तित्वाची जाणिव करुन देणार्‍या आणि ते खुलवणार्‍या माझ्या सदगुरुला माझे कोटी कोटी वंदन.

     या सद्गुरुने माझे अस्तित्व खुलवले ते कसे?
     तर,
     मला मुळातच लिखाणाची खूप आवड. शाळेत असताना चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्यकला, मैदानी खेळ, तसेच शाळेने आयोजिलेले विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणं आणि ते मनापासून एन्जोय करणे हीच माझी शाळेतली सर्वात सुंदर गोष्ट. पण मोठे झाल्यावर कॉलेज लाईफमध्ये बालपण हरवल्यासारखे झाले.  

     ज्याक्षणी माझ्या ह्या सैरभैर बेभान मनाला अनिरुद्ध प्रेमसागर येउन मिळाला, त्याक्षणी हरवलेल्या बालपणासोबत आयुष्यात अखंड दरवळणारा सुगंधित अनिरुद्ध बहर, अनिरुद्ध गती सद्गुरुकृपेने लाभली.  आयुष्याचं सोनं होणं! म्हणजे काय असतं? हे बापूच्या सहवासात आल्यावर उमगतेच.

     कवितेशी काडीमात्रही संबंध नसलेली मी... सहज म्हणून सुचलेली 1st जानेवारी, २०१४ ला लिहिलेली माझी पहिली कविता आणि ती ही माझ्या सद्गुरुवरची कविता.  आणि त्यानंतर सद्गुरुकृपेने माझे लिखाण पुन्हा चालू झाले. विविध विषयांवर कविता लिहिणे, लेख लिहिणे, हे सुरु झाले. कोणाशीही स्पर्धा म्हणून किंवा त्या दृष्टीने जीवनाकडे न पाहता हे सर्व एन्जोय करत राहणे मला आवडते. 

     प्रेम, पावित्र आणि मर्यादा या त्रिसूत्रीच्या सहाय्याने संसार आणि परमार्थ साधणं, हे माझ्या बापूंनी शिकविले.
'बापू' आणि बापू कृपेने उमगलेले "मी आहे!" ह्याशिवाय आयुष्यात सुंदर आणि अवर्णनीय गोष्ट असूच शकत नाही. 

                                  - अनुप्रिया सावंत.