Showing posts with label Dhol. Show all posts
Showing posts with label Dhol. Show all posts

Wednesday, 30 September 2015

ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल...

आमची मैत्री म्हणजे धम्माल.
सुखात पार्टी घेऊन लुटणारा,
दुखात खांदा देऊन शांत करणारा.
मस्तीमध्ये त्रास देणारा,
लाडाने दुसर्याच नावाने चिडवणारा.
आणि कधी 'ती' दिसली तर...
तर त्याच नावाने चिडवणारा.

चहाची कटिंग आपल्याच खिशातून घेणारा,
हाक मारताना दोन तरी शिव्या घालणारा.
दिसला कुठेही तर हात मिळवून विचारपूस करणारा,
पोरींसमोर मात्र शिव्या देऊन शाईनिंग मारणारा.

कुठचाही प्रवास असो, भन्नाट मज्जा करणारा.
गाण्यांच्या भेंड्या घेत गाण्यांमधून चिडवणारा.
आपण चिडलो कि अजूनच चिडवणारा.
आपण साथ दिली कि (डफली अजून जोरात वाजवणारा) मनोमन सुखावणारा.

नाचा रे करून, कधी बाला डान्स तर कधी...
नागीण डान्स करायला लावून स्वता:ही डुलणारा.
कोणी डान्स करायला नाही बोलला म्हणून...
सूट म्हणून... अक्टिंग करायला लावणारा.

त्याच्या अक्टिंगमध्ये स्वता:च सहभाग घेऊन साथ देणारा.
तरी... ह्यातलेही करायला कोणी ना केलेच, तर.....
तर काय!  गपचूप एकमेकांना खुणवून
टपली, बुक्क्यांची जोरदार तयारी करणारा.

द्या रे ह्याला टपली करून हाणणारे.
लागला का रे तुला कुठे करून 
प्रेमाने दोन शिव्या देऊन जवळ घेणारे.

ह्यात प्रेम असते, आपुलकीची भावना असते.
मैत्रीचा विश्वास असतो, घट्ट मैत्रीची साद असते.

कोण कोणाच्या शिव्या खाईल? 
कोण कोणासाठी उगीचच पनिशमेंट स्वीकारेल?
हीच तर मैत्रीची बात असते,
आपुलकीची जाण असते.
ह्यातच आपली मैत्री खास असते.

नागीण डान्स काय, बाला डान्स काय,
हातावरच खोटं खोटं गिटार घेऊन वाजवणं काय?
सगळं फक्त मित्रांच्या धम्मालसाठी, 
मित्रांच्या एका दिलखुश स्माईलसाठी.

हा खरा मैत्रीचा खटाटोप असतो.
जाणीव असते ह्याची आपल्या दोस्तांनाही,
म्हणून तर त्याचं असतं हक्काने सांगणं.

मैत्री ही मित्रत्वाची जाण असते,
शिव्या घातल्या काय नि रागावलं काय?
गरजेच्या वेळेला धावणारे पाय असते.
संकटातून खेचून काढणारे हाथ असते.
परमेश्वराने दिलेली मैत्रीची देणगीच खास असते.

सारांच्या नशिबी असा दोस्ताना नसतो,
ज्यांच्याकडे असते त्यांना ह्याची जाणीव असते.
कारण ज्यांच्याकडे नसते त्यांना हा टवाळेपण भासतो.

म्हणूनच... कितीही शिव्या खाल्ल्या काय,
कितीही टपल्या पडल्या काय,
नि कोणी कसाही डान्स सांगितला काय!
सगळ काही एक कुटुंब आणि 
कुटुंबातली मेजवानीच असते.
आपल्याकडून आपल्यासाठीच असणारी 
आपल्या मैत्रीची शान असते.

ही शान... हा धागा... आयुष्यात जसा गुंफावा, 
तसा तो अधिकाधिक घट्ट होत जातो.
परमेश्वराने आयुष्या सोबत दिलेली,
अनमोल भेटवस्तूपैकी 'मैत्री' ही त्यातलीच असते.
म्हणूनच आमची मैत्री, आमचा दोस्ताना हा आमचा आहे,
आणि तो आमचा 'खास' आहे,

आम्ही वाजवतो, 
आम्ही नाचतो, 
आम्ही धम्माल करतो.
आमच्या DAD ला आवडते म्हणून.
                                                      - अनुप्रिया आदित्य सावंत.
                                        :D :D :D :D :D
                                                          (ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल)

ढोल ताशाच्या गजरात...


ना कोणता डिप्लोमा,
ना कोणती डिग्री,
इथे फक्त आणि फक्त 'प्रेम आणि भक्ती'.

बापुची ती एक झलक,
बहार येते सर्वांगांना.

कलेच्या सादेने भिनते,
अनिरुद्ध प्रेम नसनसांतुनी.

ढोल नि ताशा ही नाही नुसती कला,
त्या कलेत आहे अनिरुद्ध प्रेमाची नशा.

ढोल ताशाच्या आवाजात,
आमच्या बाप्पाचे आगमन होता क्षणीच...
बाप्पाचा चेहरा खुले, आनंदाने नाचे.
आमची कला पाहुनी,
बापू आमचा मनोमन सुखावे.

हाच उत्साह, हेच प्रेम,
आम्हाला पदोपदी घडविते.
अनिरुद्ध प्रेमाने,
अनिरुद्धमय होऊनी जाते.

तयार आहोत आम्ही,
पुन्हा त्याच जल्लोषात.
"आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या 'DAD' ला आवडते म्हणून".

                        - अनुप्रिया आदित्य सावंत.

Wednesday, 2 September 2015

आठवणीतले क्षण - ढोल प्रक्टिस - दादर ते कर्जत प्रवास...

चला संडे आला, तयारीला लागा.
प्याटर्न लक्षात आहे ना सगळ्यांच्या,
येताना ढोलचा अडीओ ऐकून या रे...
आणि सगळ्यांनी वेळेवर या.

अरे मला सकाळी कॉल कर हा!
तू आधी सकाळचा अलार्म लाव.
भावा, साहेब येणारे काय?
रात्री कोण कोण गेलंय आधीच?
तो तर रात्रीच पोचतो रे... १०० टक्के हजेरी आहे त्याची.
भाई ट्रेन कितीची पकडणार आहेस?
अरे फोन वाजल्यावर उचला रे... झोपू नका फोन बंद करून!
जाताना एकत्र जाऊयात हा!.. .दादरला भेटा.
अरे मेट्रो चालू झाली रे... घाटकोपरला भेटा सगळ्यांनी.

(रात्रीची २:३० वाजता कोठुंबेहून फोन.....)
अरे मित्रा झोपलास का?
सकाळी उठायचय ना लवकर... झोप आता वाजले बघ किती....

(समोरचा फुल झोपेत असताना पुन्हा ३:३० ला तोच फोन....)
काय करतोय रे? झोप नाही येतंय का? अजून झोपला नाहीस?
सकाळी लवकर ये प्रक्टिस करायचीय ढोलची, जरा आता झोप काढ मस्त.
(झोपेची पूर्ण वाट.....)

(सकाळी सगळे गडबडून उठत...)
अरेच्या... वाजले किती? अरे अलार्म वाजलाच नाही? (अलार्म लावलाच नाही)
माझा कॉल वाजून गेला, आता काही खैर नाही.
१० मिनटात ट्रेन सुटेल, चल आंघोळ राहू देत.
अरे आहे तसाच ये बाबा... आम्ही थांबतो पुढे.
तू ये रे निवांत... एक काम कर तिथे जेवायलाच ये ना....
भाई तू येउच नको रे, आज आराम कर घरपे.

(ट्रेन पकडताना....)
अरे तू कुठे आहेस, माझी ट्रेन समोरून गेली रे,
पाठून कोणी येतंय का सोबतीला,
 अरे त्याला कॉल करा, झोपला असेल अजून.
नाही... त्याला आदल्यादिवशीच उचलतात सोबत.
अरे मग कोणी पाठून येतंय का?
तुम्ही अजून झोपा काढा ना ट्रेन आपल्याच आहेत.

(नेरळला उतरल्यावर...)
तू ह्याच ट्रेन मध्ये?
अरे तो पण असेल इथेच बघा त्याला पण...
दोस्त, तू आया...
अरे सब एकही ट्रेन मे???
क्या बात क्या बात, इसे केहते हे याराना....
शाब्बास दोस्ता शाब्बास....

(टमटमचा प्रवास...)
अहो काका घ्या ना एवढेच पैसे असं काय करताय....
आम्ही एवढे जण आहोत सगळ्यांना घ्या एकत्र...
अरे तू दुसरा बघ तो कमी घेतोय का....
या रे इकडे भेटली गाडी.
कसं बसणार एवढे?
अरे ह्याला ढकला रे आत...
आधी ह्या जाड्याला आत पाठवा...
हा बघ! हा बघ... हा बारीक आहे बसवा बारक्यांना आधी.
ए... सरक रे आत.

(गाडी फुल....)
झाली का रे जागा...
कसं वाटतंय... सरक रे जरा...
अरे यहापे जगह देख कितना हे, आरामसे बैठा हे ये तो...
अरे अभंग चालू करा....
अरे हा झोपला गाडीत द्या एक एक...

(टपल्यांचा आवाज.... जणू काही टम टम वाल्या काकांना टाळ्या वाजल्याचा भास.)
:D :D :D :D :D
                                               - अनुप्रिया आदित्य सावंत.

Thursday, 27 August 2015

कोठींबे म्हंटले कि धम्माल.....


कोठींबे म्हंटले कि धम्माल.....
सकाळी उठायचं आणि ट्रेन पकडायला धावायचं.
ज्याची ट्रेन सुटेल त्याने सोबतीला 
कोणाची ट्रेन सुटली का ते पहायचं.

सर्वीकडे फोन फिरवल्यावर भिडू आपल्याला गवसतोच.
अरे तुझी पण ट्रेन मिस करून दोघेही खुशाली कळवतात.

नेरळ गाठल्यावर रमत-गमत सगळ्यांना शोधायचं,
सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्यावर 
रिक्षा जवळ पळत पोहचायचं.

कोण पैसे कमी घेणार म्हणून रिक्षावाल्या काकांना,
हरभराच्या झाडावर चढवायचे,
टम-टम मिळालीSS... या रे सर्वांनी इकडेSS करत दिंडोरा पिटायचा.

जागा पकडण्यासाठी लागलीच धावत पळत सुटायचे.
हुश्श... मिळाली एकदाची टम-टम करुनी प्रवास सुरु खरा कोठींबेचा.
अहा... खरा प्रवास तर धम्माल करायचा...





धडाSमSS.. धूड... अरे डोक्याला लागले... अरे हाताला लागले...
माझी बेग घे रे... मी पडेन रे आता खाली...

आपटत आपटत टम-टम सैरभैर पळे....
साऱ्यांची मस्ती पाहुनी टम-टम ही डुले.

पोचलो रे पोचलो थांबवा इथे गाडी,
तिथला सारा परिसर मनाला हर्षित करे.

कोठींबेचे वातावरणच न्यारे...
पावसाचा मोसम, हवेतला गारवा, हिरवीगार झाडे,
त्यावर बरसलेल्या सरी,
पानांवर पडून दवबिंदू चमके.

ढोलाच्या आवाजात झाडांनीही डूलावे.
हवेतला गारवा पावसाच्या सरी घेउनि धावे.
काय ती धम्माल पावसांच्या सरी सोबत,
जशी आमच्या ढोल-ताश्यांच्या तालाची कमाल.
वाऱ्याच्या झोकात झाडांसोबती डुलुनी,
मनालाही प्रफुल्लीत करून बेभान होऊन नाचावे.

कोठींबेतले प्रत्येक गोष्टी मनाला भुलवणारे,
गोठ्यातले गाई-म्हशी, शेळी, वडाचे उंच झाड,
झाडाभोवती असलेले मैदान
त्यांच्या सभोवताली असलेले कुंपण,
कुंपणात पावसाने भिजलेले छोटे-छोटे गवते,
मखमल पसरल्यागत अवतरलेले.

उंच उंच डोंगर, पावसामुळे आलेली धुके,
गर्द झाडे सोबतीला तिथे दिसलेले नि न दिसलेले,
नानाविध छोटे छोटे प्राणी,
त्यांना पाहण्याची गम्मतच निराळी.

किती छान आहे आमच्या बापूंचे कोठींबे,
जणू एक विशाल देवराज्य अवतरल्यासारखे गोकुळच.
कृष्ण मंदिर, द्वारकामाई, प्रत्यक्षात परमेश्वर वास्तव्य,
झाडे - झुडपे, डोंगर त्यांना मिळालेले निसर्ग सोंदर्य.

मनाला सुखावणारा हवेतला गारवा.
सारं काही विसरून मनाला फक्त...
सुख, आनंद, शांतता देणारं.
असं आमच्या बापूंचे कोठींबे आणि 
बापूंच्या कृपेने आम्ही करत असलेली धम्माल,
सगळं काही खूप मस्तच आहे.

आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या Dad ला आवडते म्हणून.

                                           - अनुप्रिया आदित्य सावंत.

Saturday, 22 August 2015

माझे मनोगत - ढोल बाजे

          ढोल माझी आवड.  ढोल माझे प्रेम.  ढोल माझा आनंद.  ढोल माझा श्वास.  ढोल पाहिले तरी अंगात वीरता येते.  अंग शहारून जाते.  ढोलाचा नादच भारी.  आपणही कंबरेला ढोल बांधावा.  बेभान होऊन वाजवावे.  ढोलाचा टीपरूच हातात घेतल्यावर मनगटात जे बळ येते त्याची तुलना कोणत्या ताकदीशी होऊ शकत नाही, असे मला वाटते.  माझे गाव पुणे.  मला पुण्याला ढोल वाजवायला जायला मिळाव म्हणून कधी शिक्षणाचे निमित्त तर कधी नोकरीचे निमित्त करून तिथे जाता यावा ह्यासाठी माझी धडपड चाले.  

        मुंबईत नोकरी करत असताना मला interview चा कॉल आला.  त्यांचे टेलीफोनिक आणि पर्सनल असे एक एक राउंड करत ५ व्या राउंडला फाईनल सिलेक्शन झाले. तुला ट्रेनिंग साठी १५ दिवस पुण्याला जावे लागेल.  हे ऐकूनच खुश झाले होते.  जॉब पेक्षा खरा आनंद यंदा पुण्याला जाऊन ढोल वाजवायला मिळेल हाच होता.  गणेशोस्तव जवळ आलेला.  मागच्या दोन वर्षापासून मी माझ्या पुण्याच्या ग्रुप मध्ये ढोल साठी येणार म्हणून त्यांना सांगून झाले होते पण त्या वर्षी जायला भेटल नाही म्हणून आता तरी स्वप्न पूर्ण होईल ह्या आशेत मी खूप खुश होते.

        ट्रेनिंग साठी पुण्याला १५ दिवस जावे लागेल असे त्यांनी सांगितले.  तसेच राहण्याची सोय न झाल्यास मला तसे ट्रेनिंग शेडूल करून देऊ असेही सांगितले गेले. सगळे फाईनल झाले आणि माझी आहे त्या जॉब मधून रीजाईन करण्यासाठी आणि तसेच पुण्याला जाऊन राहण्यासाठीची सर्व तयारी सुरु झाली.  सर्व तयारी झाल्यावर मला त्या कंपनीतून फोन आला कि, ऑफर लेटर आपको आप इमेजिएट जोइन करणे के समय मिलेगा| सगळ काही झाल्यावर अचानक असा फोन गडबडून गेले. कारण हे शक्यच न्हवत. सद्गुरूंचा फोटो समोरच होता. रडले मी बापू जवळ म्हंटल मागच्या वर्षी पासून पुण्याला जायचे म्हणतेय ढोलसाठी, पण ह्याही वर्षी जाणे होत नाहीये बापू. जोब्चे मला काहीच वाटत न्हवते पण सगळ काही ढोल वाजवायला मिळण्यासाठी चाललेली खटाटोप होती.

        मला अजूनही तो क्षण खूप छान आठवतोय. सद्गुरु जवळ रडत असताना अचानक त्याच क्षणी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मला बोलली, मला १ ते ६ हात ढोलचे हवे आहेत ते सांग ना! मी मनात बोलली, हि अशी का विचारतेय? एवढं कधी विचारलं नाही.  आजच आणि तेही माझा नेमकं ढोलचे पुण्याला जाण्याचे कॅन्सल व्हावे तेव्हाच?  तिला म्हंटल देते आणि फोन ठेवून सद्गुरुंकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा मला एवढा हसताना दिसला कि मी विचारात पडले. आणि पटकन ट्यूब पेटली बापूंकडे ढोल वाजवतात. तिला फोन केला आणि विचारल, मध्येच का विचारलस तू आणि कशासाठी? बोलली अगं हव होतं. ती पुढे बोलायचा आत मी तिला प्रश्न केला बापूंकडे ढोल चालू झालं का? तर बोलली हो. मी बोलली माझ्यासाठी विचार तर सांगितल फुल झाले आहेत; आता कोणाला घेत नाहीत. पुन्हा निराशा झाली माझी. कारण मला 'ढोल' चीच पडली होती. ढोल माझं passion.  म्हंटल, ठीक आता काय करू असा बघून बापूकडे पाहिले पुन्हा बापू हसला. 
    
         ढोलमध्ये नवीन कोणाला घेत न्हवते.  मला सांगितले गेले तू लेझीम मध्ये जा. मनात बोलली ठीक आहे, आपण लेझीम एन्जोय करून पाहू, नाराज नको व्हायला. आणि मी लेझीम खेळत असताना ते लेझीमच्या काउंटच्या ऐवजी मी हातातली लेझीम ढोलच्या टीपरु पकडल्यागत वाजवत सगळ लक्ष ढोलकडे. लेझीमची को-ओर्डीनेटर बोलली जायचं का तिथे?  मनात म्हंटल हा, मी त्याचसाठी आहे.  क्षणातच मला निरोप आला तुला बोलावलंय.  आणि माझी ढोल मध्ये एन्ट्री पक्की झाली.

         त्यातही मला ढोलमध्ये माझ्या सद्गुरुं समोर ढोल वाजवण्याची संधी आली.  बापू जस-जसा जवळ येत होता धडधड वाढत होती.  आगमनाच्या वेळेस ज्यावेळी आम्ही गुरुक्षेत्रमला सद्गुरुं समोर वादन करणार होतो, तेव्हा पुढे मला थांबायला सांगितलेले.  तेव्हा अक्षरश त्याच्या समोर गेल्यावर खरच काही सुचत नाही हे खरं आहे. मी फक्त त्यालाच बघत होती. आणि त्यावेळी त्याने मला दोनही डोळे मिचकावून जी नजर दिली ती अफलातून होती.  श्रीराम. आणि एवढा गोड हसला, जसा कि माझा बापू मला बोलला; झाली का तुझी इच्छा पूर्ण. श्रीराम! श्रीराम!!! श्रीराम!!!!! खूपच सॉलिड क्षणं होता तो माझ्या आयुष्यातला.  सद्गुरुकृपेने मी अंबज्ञ आहे.  विश्वासात भक्तीत मी कमी पडतेय पण तरीही माझा भार माझा अनिरुद्ध, माझा बाप उचलतोय. माझी फुल सेटिंग बापूने लावली अगदी १०८ टक्के.  होळीच्या दिवशी साईनिवासला मी पोचतही न्हवते आणि मला बापूंच दर्शन मिळनहि शक्य न्हवत पण लास्ट रो मधून मला फर्स्ट रो मध्ये आणणारा माझा बाप, मला माझ्या आय लव यु ला, लव यु बाळा बोलला ह्या त्याच्या उत्तराने खरच अगदी १०८ टक्के माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या बापूचरणी अर्पण आहे. आणि हे सर्व तोच करून घेतो आणि तोच करतो. मला कुठून कसं आणलं, त्याला माझ्यासाठी किती कष्ट पडले हे तोच जाणतो.  

जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित |
हे मात्र मी नक्की जाणीत | नाही तकरार राघवा ||

                                                                                                                                                                    - अनुप्रिया आदित्य सावंत.

Friday, 21 August 2015

वादक - अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक

(Photo Source : https://www.facebook.com/shrianiruddhagurukshetrampathak/photos/)


बापूंनी आमच्यातला 'वादक' अचूक हेरला,
आमच्यातली 'कला' ओळखून जल्लोष घडवला.

जल्लोष जल्लोष जल्लोष,
ह्याची खरी धुंधी,
बापूंच्या प्रेमाने नसानसांत भिनली.

निमित्त एकच,
'अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.
आमच्यातला कलाकाराला
'कलादालन' खुले झाले.
आयुष्याला नवीन दिशा,
दिशेला नवीन मार्ग मिळाला.

कला माणसाला जीवन जगायला शिकवते,
बापूंनी प्रत्यक्षात जीवन सजवायला शिकवले.

बापू आमच्या आयुष्यात,
सद्गुरु म्हणून लाभला.
तेथूनच आयुष्याच्या वळणाला,
सुंदर कलाटणी लाभली.

असा हा आमचा बापू,
नुसता आमचा बापच नाही.
तर आमचा खराखुरा,
'आप्त' म्हणून भेटला.

आमच्यातला सुप्त गुणांना,
भारीच वाव मिळाला.
कारण संगतीला अनिरुद्धाची,
नावच आयुष्यात उतरली.

असा हा आमचा बाप लईच भारी हायं!!!!!
म्हणूनच अनिरुद्धाची पोरं हुशार हायं!!!!!!

                                        - अनुप्रिया आदित्य सावंत.
                                        ('अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.)