आमची मैत्री म्हणजे धम्माल.
सुखात पार्टी घेऊन लुटणारा,
दुखात खांदा देऊन शांत करणारा.
मस्तीमध्ये त्रास देणारा,
लाडाने दुसर्याच नावाने चिडवणारा.
आणि कधी 'ती' दिसली तर...
तर त्याच नावाने चिडवणारा.
चहाची कटिंग आपल्याच खिशातून घेणारा,
हाक मारताना दोन तरी शिव्या घालणारा.
दिसला कुठेही तर हात मिळवून विचारपूस करणारा,
पोरींसमोर मात्र शिव्या देऊन शाईनिंग मारणारा.
कुठचाही प्रवास असो, भन्नाट मज्जा करणारा.
गाण्यांच्या भेंड्या घेत गाण्यांमधून चिडवणारा.
आपण चिडलो कि अजूनच चिडवणारा.
आपण साथ दिली कि (डफली अजून जोरात वाजवणारा) मनोमन सुखावणारा.
नाचा रे करून, कधी बाला डान्स तर कधी...
नागीण डान्स करायला लावून स्वता:ही डुलणारा.
कोणी डान्स करायला नाही बोलला म्हणून...
सूट म्हणून... अक्टिंग करायला लावणारा.
त्याच्या अक्टिंगमध्ये स्वता:च सहभाग घेऊन साथ देणारा.
तरी... ह्यातलेही करायला कोणी ना केलेच, तर.....
तर काय! गपचूप एकमेकांना खुणवून
टपली, बुक्क्यांची जोरदार तयारी करणारा.
द्या रे ह्याला टपली करून हाणणारे.
लागला का रे तुला कुठे करून
प्रेमाने दोन शिव्या देऊन जवळ घेणारे.
ह्यात प्रेम असते, आपुलकीची भावना असते.
मैत्रीचा विश्वास असतो, घट्ट मैत्रीची साद असते.
कोण कोणाच्या शिव्या खाईल?
कोण कोणासाठी उगीचच पनिशमेंट स्वीकारेल?
हीच तर मैत्रीची बात असते,
आपुलकीची जाण असते.
ह्यातच आपली मैत्री खास असते.
नागीण डान्स काय, बाला डान्स काय,
हातावरच खोटं खोटं गिटार घेऊन वाजवणं काय?
सगळं फक्त मित्रांच्या धम्मालसाठी,
मित्रांच्या एका दिलखुश स्माईलसाठी.
हा खरा मैत्रीचा खटाटोप असतो.
जाणीव असते ह्याची आपल्या दोस्तांनाही,
म्हणून तर त्याचं असतं हक्काने सांगणं.
मैत्री ही मित्रत्वाची जाण असते,
शिव्या घातल्या काय नि रागावलं काय?
गरजेच्या वेळेला धावणारे पाय असते.
संकटातून खेचून काढणारे हाथ असते.
परमेश्वराने दिलेली मैत्रीची देणगीच खास असते.
सारांच्या नशिबी असा दोस्ताना नसतो,
ज्यांच्याकडे असते त्यांना ह्याची जाणीव असते.
कारण ज्यांच्याकडे नसते त्यांना हा टवाळेपण भासतो.
म्हणूनच... कितीही शिव्या खाल्ल्या काय,
कितीही टपल्या पडल्या काय,
नि कोणी कसाही डान्स सांगितला काय!
सगळ काही एक कुटुंब आणि
कुटुंबातली मेजवानीच असते.
आपल्याकडून आपल्यासाठीच असणारी
आपल्या मैत्रीची शान असते.
ही शान... हा धागा... आयुष्यात जसा गुंफावा,
तसा तो अधिकाधिक घट्ट होत जातो.
परमेश्वराने आयुष्या सोबत दिलेली,
अनमोल भेटवस्तूपैकी 'मैत्री' ही त्यातलीच असते.
म्हणूनच आमची मैत्री, आमचा दोस्ताना हा आमचा आहे,
आणि तो आमचा 'खास' आहे,
आम्ही वाजवतो,
आम्ही नाचतो,
आम्ही धम्माल करतो.
आमच्या DAD ला आवडते म्हणून.
- अनुप्रिया आदित्य सावंत.
:D :D :D :D :D
(ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल)
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.