Friday 7 August 2015

बूटिंग क्रिया (Booting Process)

     
     संगणक सुरु करण्याच्या किंवा होण्याच्या प्रक्रियेला 'बूटिंग प्रोसेस' असे म्हणतात. जेव्हा आपला संगणक सुरु होतो तेव्हा प्रथम बूटिंग प्रोसेसमध्ये सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे लोडिंग आणि तपासणी होत असते. ह्या तपासणीत जर काही चूक आढळली नाही तर संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम लोड होते. आजकालच्या फास्ट टेकनॉलोजी (यंत्रणा) मुळे ही प्रकिया आपोआप होते. ही प्रक्रिया ज्या सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे होते त्या प्रोग्रामला BIOS किंवा 'बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम' असे म्हणतात.

     
     BIOS हे सॉफ्टवेअर रॉम (रिड ओन्ली मेमरी) मध्ये संग्रहित केलेले असते. त्यामुळे संगणक चालू केला असता हे सॉफ्टवेअर लगेच कार्यरत होते. प्रत्येक साधन व सुविधा ह्यांचे आपल्या संगणकावर लोड होणे हे BIOS वर अवलंबून असते. ह्या सुविधा व ही साधने लोड झाल्यावर मात्र त्यांची देखरेखीची व्यवस्था आपल्या संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टमकडे येते.

ह्या बूटिंगचे प्रामुख्याने दोन प्रकार येतात -


१) कोल्ड बूटिंग - जेव्हा संगणकाचा वीजपुरवठा (पॉवर) बंद केल्यावर पुन्हा नव्याने संगणक सुरु केला जातो. तेव्हा होणाऱ्या प्रक्रियेला 'कोल्ड बूटिंग' किंवा 'हार्ड बूटिंग' असे म्हणतात.

२) वॉर्म बूट - काही वेळेस आपण संगणकावर काम करत असताना संगणक मध्येच थांबतो. आपण त्यावेळी पटकन संगणक हेंग झाला असे म्हणतो. त्यावेळेस आपण तो संगणक थांबलेल्या प्रोसेसमध्ये असतानाच सी.पी.यु. वरील 'रिसेट' (Reset) चे किंवा CTRL + ALT + DEL या तीन कीज एकाचवेळी दाबून तो संगणक पुन्हा सुरु करतो. ह्या प्रोसेस करताना होणाऱ्या प्रक्रियेला 'वॉर्म बूटिंग' असे म्हणतात.  आणि ह्यालाच 'रिबूट' असेही आपण म्हणतो.
RESET BUTTON

  CTRL + ALT + DEL

     ह्या 'बूटिंग प्रोसेस' विषयी आपण जाणून घेतले. परंतु, संगणकाच्या एवढ्या नानाविध प्रक्रिया(प्रोसेस) नेमक्या कुठून आणि कश्या होतात?  संगणकालाही आपल्या मानवांसारखा मेंदू असतो का?  त्याची मेमरी कश्या प्रकारे कार्य करते?  संगणकाच्या मेमरी विषयी जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                                                                                  - अनुप्रिया सावंत.

                मागील लेख                                                                                        पुढे पहा

4 comments:

  1. Anupriya you have nicely covered basics of Operating System , Warm booting, cold booting in very easy manner as well as language. Thanks waiting for next part .... .

    ReplyDelete
    Replies
    1. Thank You.
      I will try to cover basic computer knowledge in simple language.

      Delete
  2. After reading your article I got clear idea about what is mean by bios and how it's work . very nice explanation in simple language . eagerly waiting for next article............

    ReplyDelete
    Replies
    1. Thanx.
      The new Article has been posted regarding Computer Memory.
      You can have a look.
      http://anupriyasawant.blogspot.in/2015/08/Computer-Primary-Memory.html

      Delete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.