Thursday, 27 August 2015

कोठींबे म्हंटले कि धम्माल.....


कोठींबे म्हंटले कि धम्माल.....
सकाळी उठायचं आणि ट्रेन पकडायला धावायचं.
ज्याची ट्रेन सुटेल त्याने सोबतीला 
कोणाची ट्रेन सुटली का ते पहायचं.

सर्वीकडे फोन फिरवल्यावर भिडू आपल्याला गवसतोच.
अरे तुझी पण ट्रेन मिस करून दोघेही खुशाली कळवतात.

नेरळ गाठल्यावर रमत-गमत सगळ्यांना शोधायचं,
सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्यावर 
रिक्षा जवळ पळत पोहचायचं.

कोण पैसे कमी घेणार म्हणून रिक्षावाल्या काकांना,
हरभराच्या झाडावर चढवायचे,
टम-टम मिळालीSS... या रे सर्वांनी इकडेSS करत दिंडोरा पिटायचा.

जागा पकडण्यासाठी लागलीच धावत पळत सुटायचे.
हुश्श... मिळाली एकदाची टम-टम करुनी प्रवास सुरु खरा कोठींबेचा.
अहा... खरा प्रवास तर धम्माल करायचा...





धडाSमSS.. धूड... अरे डोक्याला लागले... अरे हाताला लागले...
माझी बेग घे रे... मी पडेन रे आता खाली...

आपटत आपटत टम-टम सैरभैर पळे....
साऱ्यांची मस्ती पाहुनी टम-टम ही डुले.

पोचलो रे पोचलो थांबवा इथे गाडी,
तिथला सारा परिसर मनाला हर्षित करे.

कोठींबेचे वातावरणच न्यारे...
पावसाचा मोसम, हवेतला गारवा, हिरवीगार झाडे,
त्यावर बरसलेल्या सरी,
पानांवर पडून दवबिंदू चमके.

ढोलाच्या आवाजात झाडांनीही डूलावे.
हवेतला गारवा पावसाच्या सरी घेउनि धावे.
काय ती धम्माल पावसांच्या सरी सोबत,
जशी आमच्या ढोल-ताश्यांच्या तालाची कमाल.
वाऱ्याच्या झोकात झाडांसोबती डुलुनी,
मनालाही प्रफुल्लीत करून बेभान होऊन नाचावे.

कोठींबेतले प्रत्येक गोष्टी मनाला भुलवणारे,
गोठ्यातले गाई-म्हशी, शेळी, वडाचे उंच झाड,
झाडाभोवती असलेले मैदान
त्यांच्या सभोवताली असलेले कुंपण,
कुंपणात पावसाने भिजलेले छोटे-छोटे गवते,
मखमल पसरल्यागत अवतरलेले.

उंच उंच डोंगर, पावसामुळे आलेली धुके,
गर्द झाडे सोबतीला तिथे दिसलेले नि न दिसलेले,
नानाविध छोटे छोटे प्राणी,
त्यांना पाहण्याची गम्मतच निराळी.

किती छान आहे आमच्या बापूंचे कोठींबे,
जणू एक विशाल देवराज्य अवतरल्यासारखे गोकुळच.
कृष्ण मंदिर, द्वारकामाई, प्रत्यक्षात परमेश्वर वास्तव्य,
झाडे - झुडपे, डोंगर त्यांना मिळालेले निसर्ग सोंदर्य.

मनाला सुखावणारा हवेतला गारवा.
सारं काही विसरून मनाला फक्त...
सुख, आनंद, शांतता देणारं.
असं आमच्या बापूंचे कोठींबे आणि 
बापूंच्या कृपेने आम्ही करत असलेली धम्माल,
सगळं काही खूप मस्तच आहे.

आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या Dad ला आवडते म्हणून.

                                           - अनुप्रिया आदित्य सावंत.

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.