बालपण कुठेतरी हरवतंय...
चंदेरी-सोनेरी दुनियाची भुलभुलैय्या भुलवतेय...
मैदानी खेळ, हसत-खेळत गप्पा,
त्याची जागा मात्र आता...
एकांत आणि कॅम्प्यूटरच्या विश्वाने व्यापलीये,
बालपण कुठेतरी हरवतंय...
स्वतःचे अस्तित्व हरून,
मायेची दुनिया भुलवतेय,
इंटरनेटच्या दुनियेत फिल्मी स्वप्न रंगवतेय.
बालपण कुठेतरी हरवतंय...
निरागस कोमल भाव,
अहंम पणा घेतोय,
ऐकलकोंडी मन 'मी' पणा मिरवतोय.
बालपण कुठेतरी हरवतंय...
मित्र-मैत्रिणींच्या गप्पांत कट्टा कुठेतरी हरवतोय,
त्याची जागा आता ग्रुप चैट बळकावतोय.
बालपण कुठेतरी हरवतंय....
स्वतःचे अस्तित्व 'मी' पणात विरतंय,
आयुष्यं जगण्याची कला चंदेरी-सोनेरी दुनिया भुलवतेय.
बालपण कुठेतरी हरवतंय...
बालपण कुठेतरी हरवतंय...
मनाचा मनाशी चाललंय संवाद,
कुठेतरी हे गवसतयं,
बालपण कुठेतरी हरवतंय...
काहीतरी मार्ग स्वतःच काढायला हवा,
आपल्यातल्या बाल मनाला ओळखून,
मोकळा श्वास घ्यायला हवा.
बालपण कुठेतरी हरवतंय...
स्वतःच्या बाल मनाला जगवायला हवं,
मनाचा मनाशी सुसंवाद घडवायला हवं.
बालपण कुठेतरी हरवतंय...
हरवलेलं बालपण नव्याने आयुष्यभर जगवायला हवं,
बालपणाची मज्जा जीवनभर आनंदाने अनुभवायला हवं,
बालपण कुठेतरी हरवतंय...
- अनुप्रिया सावंत.
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.