प्रत्येकात काही ना काही छुपे गुण असतात,
प्रत्येकात दडलेला एक कलाकार असतो.
इकडे तिकडे कुठेच काही नसते.
प्रत्येकाच्या हृदयातच एक कलाकार असतो.
थोडीशी जाणीव थोडीशी तळमळ,
मी ही आहे काहीतरी, असावा हा ध्यास.
आपल्यातला कलाकाराच्या सुप्त गुणांना द्यावा वाव.
स्वतःच्या सुप्त गुणांना स्वतःच वाव द्यायचा असतो.
स्वतःतल्या कलाकारासाठी दालन स्वतःच उघडावयाचे असते.
कोणी मला काय म्हणेल? माझं बरोबर असेल ना?
कोणी मला हसले तर? जीव माझा हमसेल ना?
कशाला हवी विचारांची ऐशी तैशी,
होऊन जाऊद्या एकाच नाद,
कलाकार आमच्यातला आहे खास.
हीच तर कलाकाराची बात आहे,
इथे सगळ काही खास आहे,
प्रत्येकात एक न्यारी बात आहे!!!
- अनुप्रिया सावंत.
अनुप्रिया मानवातील सुप्त कलागुणांचा वेध घेणारे आणि त्यांना जोपासायला प्रेरीत करणारे अत्यंत मनस्वी ,हृदयंगम दर्शन आपल्या या कवितेतून होते... खूपच छान मांडणी!
ReplyDelete