(WHENEVER WE EXPRESS OUR FEELINGS BY WRITING , WE HAVE TO USE SOME SYMBOLS AND THESE SYMBOLS ARE CALLED PUNCTUATION MARKS.)
Ø "वाह! किती छान."
Ø तुझे नाव काय आहे?
Ø मी अनुप्रिया आहे.
वाक्य वाचताना आपल्याला त्या चिन्हांनुसार आवाजातील चढ उतार बदलताना जाणवतो. आणि म्हणूनच आपल्याला त्या वाक्यांतील भाव ओळखण्यास मदत होते. अशा चिन्हांच्या संचांना(Group) आपण 'विरामचिन्हे' म्हणतो.
v लेखनात येणारी प्रमुख विरामचिन्हे अभ्यासुयात.
१. पूर्णविराम (.) – (Full Stop)
१. वाक्य/विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी ह्याचा वापर करतात.
उदाहरणार्थ,
- माझे नाव अनुप्रिया आहे.
२. शब्दांचे संक्षिप्त रूप (In short) दर्शविण्यासाठी आद्याक्षरापुढे ह्याचा वापर करतात.
उदाहरणार्थ,
वि. वि. = (विनंती विशेष)
वि. दा. सावरकर = (विनायक दामोदर सावरकर)
२. स्वल्पविराम (,) - (Comma)
एकाच प्रकारचे अनेक शब्द एकामागोमाग / लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ,
छान, सुंदर, अप्रतिम आणि जबरदस्त काम केले आहेस.
- दुसऱ्याला उद्देशून/संबोधन करताना स्वल्पविराम वापरला जातो.
उदाहरणार्थ,
सीमा, हे पुस्तक वाच.
प्रश्न चिन्ह(?) – (Question Mark)
प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिन्हाला प्रश्न चिन्ह असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
• तुझे नाव काय आहे?
• तू कुठे राहतोस?
उद्गारवाचक चिन्ह (!) – (Exclamation Mark)
• आनंद, दुःख, आश्चर्य, राग अशा भावना व्यक्त करताना शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्हांचा वापर करतात.
उदाहरणार्थ,
अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
अवतरण चिन्ह (") (‘) – (Quotation Mark)
दुसऱ्यांचे म्हणणे, महत्वाचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर करतात.
Ø दुहेरी अवतरण चिन्ह (")
Ø एकेरी अवतरण चिन्ह (‘)
एकेरी अवतरण चिन्ह (‘) - जेव्हा महत्वाच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दर्शवायचा असेल तेव्हा एकेरी चिन्हांचा वापर करतात.
उदाहरणार्थ,
ü साने गुरुजी ह्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचनीय आहे.
ü 'ज्ञानेश्वर' हे थोर संत होते.
दुहेरी अवतरण चिन्ह (") - बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ,
ü शिक्षक म्हणाले, "मुले अतिशय हुशार आहेत."
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.