![]() |
'दहशतवाद व कट्टरपंथीयांपासून साऱ्या जगाला धोका' ही 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली. 'दहशतवाद व कट्टरवादी यापासून साऱ्या जगाला मोठा धोका संभवतो. म्हणूनच या धोक्याच्या विरोधात साऱ्या जगाने एकजुटीने कारवाई करायला हवी', असे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी आवाहन केले आहे. दहशतवाद आणि कट्टरवाद या जगासमोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत.
भीती व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हिंसात्मक गुन्हेगारी दहशतवादींकडून घडवून आणली जाते. राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे दहशतवादी संघटित, नियोजित व हिंसात्मक कृती घडवून आणतात. लोकांच्या धर्मभावना भडकवून राजकारण व धर्माच्या हट्टाहासासाठी खेळी खेळल्या जातात. ह्याचा ज्वलंत इतिहास म्हणजे पाकिस्तानचे धार्मिक युद्ध व काश्मिरी पंडितांचा बळी. उठाव आणि दंगली ह्यातून कट्टरपंथीय त्यांची भूमिका(?) वरचढ ठरवतात. आज कट्टरपंथी हे समाजावर वरचढ झालेले आहेत.
ह्याविरोधी आवाज उठवणे महत्वाचे झाले आहे. गेल्यावर्षी सुरक्षदलांनी हाती घेतलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांच्या संपूर्ण उच्चाटनासाठी प्रचंड यशस्वी ठरले. ह्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे खच्चीकरण झाले.
कट्टरपंथीयांची भूमिका ही अत्यंत द्वेषाची व वातावरण चिघळवण्याची आहे. आताच्या पॅलेस्टाईन लढ्यामागे इस्लामी हेतू असल्याची दाखवले जात आहे , मात्र त्यांचा मूळ हेतू मात्र अधिराज्य प्रस्थापित करणं आहे. कट्टरपंथीय हे कोणत्याच देशाचे, राज्याचे किंवा मानवी हिताचे असूच शकत नाही.
कट्टरपंथीय जे तिसरे महायुद्धाच्या पटलावर कसे कार्यरत आहे, हे पहायचे झाले तर बरीच उदाहरणे आपल्या लक्षात येतील.
सौदीचे कट्टरपंथीय अमेरिका व इस्राईल विरोधक आहेत. अस्साद राजवट आणि तेथील चाललेले खरे खोटे संघर्ष ह्याबद्दलही आपल्याला वृत्तपत्रातून हळू हळू माहिती होत चालले आहे.
अमेरिकेतील इस्लामधर्मीय नेते 'वर्कशॉप फॉर पॅलेस्टाइन' बद्दल योजना आखताना वरवर जरी मानवतावादाचा दावा करत असले तरी त्यांची खरी योजना ही इस्राईल विरोधीच आहे. जनतेला चिथावणी देणे, ज्यूंची कत्तल करून जेरुसलेमचा ताबा घेणे, जगभरातून जनतेला पॅलेस्टाईनच्या बाजूने वळवण्यासाठी मानवतावादाच्या नावाने सहाय्यता मिळवून त्याचे मार्केटिंग करणे. कट्टरवादांचे असे अनेक मास्टरमाइंड प्लॅन जगभरात कार्यरत आहेत.
युरोपात देखील हे कट्टरपंथीय फारच आक्रमक आहेत. काही आठवड्यापूर्वीच अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये ज्यूधर्मीय द्वेषभाव बाळगणाऱ्यांनी केलेल्या विघातक कृत्यांच्या बातम्या समोर आल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आधीही ज्यूधर्मीयांच्या विरोधात असाच द्वेषपूर्ण प्रचार सुरू करण्यात आला होता. आणि आताही ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
भारतात झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला, कट्टरपंथीयांनी घडवलेल्या 1993 च्या दंगली, बॉम्बस्फोट हे कोणीही विसरू शकत नाही. आताच्या घडामोडीला चालू असलेला राममंदिराचा प्रश्न हा तर खूपच संवेदनशील आहे. हा प्रश्न खरं तर प्रत्येक भारतीयांच्या मनाचा संवेदनशील भाग आहे. दहशतवादी संघटनेने राम मंदिर संदर्भात दिलेली धमकी ही चिथावणीची भाषा आहे. ह्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध पेट घेऊ शकतं हे आपण सर्वच जाणतो.
चालू घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने विशेष लक्ष वेधून घेतात. दहशतवाद व कट्टरपंथीय या साऱ्यांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने खडे ठाकले पाहिजे, असे आवाहन दूरदृष्टी असणारे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी केलेले हे विधान विशेष लक्षवेधी आहे.
ह्या गोष्टी फक्त अमेरिका, इराण, इस्राईल, युरोप, अरब ह्या देशातच चालू आहेत, ह्या भ्रमातून आपण भारतीयांनी बाहेर यायला हवं. ह्याविषयी आक्रमक होऊन नाही तर सक्रिय भूमिका घेऊन तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेची जाणीव करून घ्यायला हवी.
आपल्याला युद्ध करायला जायचे नाही तर ते युद्ध होऊच नये किंवा त्याची झळ, त्याची तीव्रता कमी करता येण्यासाठी माझी भूमिका काय ह्याचा वेध घेता यायला हवा. त्यासाठी जगात चाललेल्या जागतिक पातळींवरील घडामोडींची माहिती ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक देशात अनेक कुगोष्टी सर्व दिशांनी प्रचंड वेगात वेगवेगळ्या पद्धतीने पसरत आहेत.
ह्याविषयीची माहिती आपल्याला
http://worldwarthird.com
या वेबसाईटवर अधिक विस्तृतरित्या पाहता येते. तसेेेच इंग्लिश, हिंदी व मराठी या तीनही भाषांमध्ये आपल्याला ह्या विषयीची अधिक माहिती उपलब्ध होते.
हल्ली आपल्या स्मार्टफोन मध्ये फेसबुक आणि ट्विटर हे दोन्ही ऍप असतात व ते आपण वापरतही असतो. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडी संदर्भातील बातमीसाठी कनेक्ट राहण्यासाठी आपण खालील ट्विटर व फेसबुक अकाऊंट आपल्याशी जोडू शकतो. जेणेकरून त्या पेजेस वरील अपडेटेड माहिती आपल्याला त्याचवेळेस नोटिफिकेशन्सद्वारे सहज उपलब्ध होते.
ट्विटर - @ww3Info , @NewscastGlobal
फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha
ह्याविषयीची माहिती आपल्याला
http://worldwarthird.com
या वेबसाईटवर अधिक विस्तृतरित्या पाहता येते. तसेेेच इंग्लिश, हिंदी व मराठी या तीनही भाषांमध्ये आपल्याला ह्या विषयीची अधिक माहिती उपलब्ध होते.
हल्ली आपल्या स्मार्टफोन मध्ये फेसबुक आणि ट्विटर हे दोन्ही ऍप असतात व ते आपण वापरतही असतो. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडी संदर्भातील बातमीसाठी कनेक्ट राहण्यासाठी आपण खालील ट्विटर व फेसबुक अकाऊंट आपल्याशी जोडू शकतो. जेणेकरून त्या पेजेस वरील अपडेटेड माहिती आपल्याला त्याचवेळेस नोटिफिकेशन्सद्वारे सहज उपलब्ध होते.
ट्विटर - @ww3Info , @NewscastGlobal
फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha
माझी भूमिका, माझी जबाबदारी, माझी आस्तिकता, माझी श्रद्धा, माझी धर्मनिरपेक्षता, माझा देश, माझे कर्तव्य, माझी निष्ठा ह्याबद्दल माझ्याच मनात नाही तर प्रत्येकाच्या मनात संवेदनशील जागृती करता यायलाच हवी. ह्याची जाणीव, खबरदारी हेच आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेला सामोरे जाण्यास सज्ज करतील. कारण... Third World War has been started...



















