Tuesday 4 December 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest


     सरकारने आखलेल्या धोरणांचा आपल्याला राग आला किंवा निषेध करायचा झाला तर आपण आंदोलने उभारतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा शब्द जवळजवळ माहीतच आहे. निषेध शांततेत होतो किंवा एखादया मैदानात सभा भरवून भाषणे केली जातात. मात्र ह्याचे स्वरूप तीव्र झाल्यास सर्वच नागरिकांना परिणामी त्या राष्ट्रालाही धोकादायक ठरते.

     भारतात 1993 ला झालेली दंगल व त्याचे स्वरूप बऱ्याच जणांनी पाहिले, अनुभवले. सरकारच्या धोरणेतील बदल जनसामान्यांनाही बदलवत असतोच.

     आपण भारतात राहत असलो तरी दुसऱ्या देशातील बदल आपल्या देशातही जाणवतो.  ह्याचे सोपे उदाहरण सांगायचे  झाले तर, देशातील आयात निर्यात वस्तूंबाबतचे करवाढ. कर वाढले की ते एकाच गोष्टीवर वाढले जातात असं कधीच होऊ शकत नाही.  प्रत्येक गोष्टींवर त्याचा परिणाम होताना आपण अनुभवतो.  दुधाचा भाव वाढला की टपरी वरील चहाचा भाव सुद्धा वधारतो.  मग तर  हॉटेलची गोष्टच वेगळी.

    बऱ्याचदा मिडल क्लास कुटुंबाचे गणित सुद्धा ह्या बदलाने बदलत जातात.  तर मग त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटांचे प्रश्नच दबले जातात. आमच्याकडे दूध विक्रेत्याने प्रत्येक लिटरमागे 2 रुपये वाढवले.  कारण ऐकून हसावं की रडावं हेच कळाले नाही.  म्हणतो कसा, क्या करे, पेट्रोल बढ गया इसलीये दूध का भाव भी बढ गया| आता सायकल वरून दूध विकताना पेट्रोल कसं खर्च होत, हे गणित काही केल्या सुटायला वेळच लागला.  सामान्य प्रश्न वाटला तरी प्रत्यक्षात त्याचा आवक खूपच मोठा आहे.

    सामान्य जनता अगदी दररोजच्या कमी अधिक बदलला सहज सामावून घेत असते.  मात्र जेव्हा हे बदल तीव्र स्वरूप घेतात तेव्हा मात्र अल्प उत्पन्न गटापासून उच्च उत्पन्न असणाऱ्या सर्वांनाच ह्याचा त्रास हा होतोच आणि त्याची परिणामीकता निषेधात होते.  हा निषेध शांत करणं हे सरकारचेच काम आहे, असं आपण सहज बोलतो ना!  पण तुम्हाला काय वाटतं... आपली जबाबदारी झटकून आपण थांबतो का?

    जागतिक घडामोडी पाहिल्या की आपण खरंच भारतात किती सुरक्षित आहोत ह्याची पदोपदी जाणीव होते.  आज फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाविषयी खूपच कमी जणांना माहित असावं. किंवा तो आपला भाग नाही, आपल्याला काय त्याचं... असही सहज म्हणतो ना आपण.

     जागतिक युद्ध हे प्रत्येक देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभावित करित असते.  हे युद्ध फक्त त्या देशांपुरतेच मर्यादित नाही राहू शकत.  कारण त्याचा विस्तार इतक्या प्रचंड वेगाने होत असतो की त्याची झळ बसल्यावर आपल्याला जाणीव व्हायला चालू होते.   फ्रांसमध्ये चालू असलेली चळवळ ही अशीच सामान्य नागरिकांपासून ते अगदी उच्चशिक्षित ते उच्चवर्ग ह्या सगळ्याच लोकांना घेऊन उभी आहे.  ह्याचे कारण(?)... वाढते इंधन कर.  ह्या चळवळीने इतके आक्रमक स्वरूप घेतले आहे की त्याला हिंसेचे रूप प्राप्त झाले आहे. 

     'गिलेट्स ज्यून्स' (पिवळे वेस्ट्स ) असे ह्या चळवळीचे नाव ठेवले गेले आहे. चळवळीत सहभागी लोकांनी पिवळे जॅकेट्स वापरून सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

     विरोधक हे फ्रान्समधील शहरे आणि ग्रामीण भागांमधून आले आहेत आणि त्यात अनेक महिला व एकल माता आहेत. बहुतेक निदर्शकांना नोकऱ्या आहेत, त्यात सचिव, आयटी कर्मचारी, कारखाने कामगार, वितरण कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी यांचाही समावेश आहे.  विरोधकांचे म्हणणे आहे की , त्यांचे कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांना बेसिक गरजा भागावणेही कठीण आहे.  काही जण म्हणतात आम्हाला खूप सावधपणे आमचं आयुष्य जगावं लागतं, जीवनातल्या सुखसोयी कमी होत चालल्या आहेत, परिणामी हॉटेल मध्ये जाण सुद्धा परवडत नाही.   काही आंदोलककारक म्हणतात की, आमचा पैसा इतका अपुरा आहे की आम्हाला आमच्या पालकांना घेऊन नर्सिंग होम किंवा धर्मदायमध्ये जावं लागतं. परिणामी ह्या सगळ्याच भावनांचा उद्रेक म्हणजे ही चळवळ.

     मॅक्रोनच्या (फ्रांस) सरकारने अनेक हवामान बदल-संबंधित इंधन कर लागू केले आहेत.  जानेवारीत आणखी एक पाऊल टाकणे समाविष्ट आहे.  मॅक्रॉन म्हणतात की, हे कर म्हणजे ड्रायव्हर्सला पर्यावरण-अनुकूल मॉडेलसाठी डिझेल-इंधन चालविणारे वाहन बदलविण्यास प्रोत्साहित करणे.  परंतु, अनेक मध्यमवर्गीय फ्रेंच नागरिकांना ही लूट वाटते.   ह्यासाठी जवळजवळ 75 हजारापेक्षा अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत.   विशेष म्हणजे ह्या चळवळीचा एकही सिंगल लीडर नाही(?) असे सांगितले जात आहे.  नोव्हेंबर आठवड्याच्या अखेरीस फ्रान्सच्या राजधानीच्या रस्त्यावर हजारो लोकांनी दंगली केल्या, त्यापैकी अनेकांनी कार चालवताना पिवळ्या पिशव्या लावल्या.

     2015 च्या पॅरिस वातावरणाच्या करारा अंतर्गत निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इंधनवाढ हा फ्रान्सच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  निवडून आल्यावर मार्कोनने पर्यावरणला प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, परंतु त्याच्या कर धोरणामुळे मध्यमवर्गीयातील बऱ्याच लोकांना वेगळे केले गेले. आणि त्याचे एकंदरीत परिणाम म्हणजे ही हिसंक झालेली चळवळ.

     फ्रान्स हा एक प्रजासत्ताक लोकप्रिय देश आहे, मात्र आज त्याची लोकप्रियता हिंसाचारात परावर्तित झाली आहे.  अतिशय घृणास्पद विध्वंस इथे चालू आहे.   जाणकारांचे म्हणणे आहे की ह्या लढाईत हिंसकता, निषेध, दंगली, विद्रोह हे अगदी गृहयुद्धापेक्षाही पुढे गेले आहे. आणि ह्यात काही कट्टरपंथीय आपले उद्दिष्ट साध्य करून घेत आहेत.
ह्या संदर्भात सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंक पहा:
वेबसाईट   - http://worldwarthird.com

ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal

फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha

     आज आपण अभिमानास्पद अशा विशाल भारतात राहतो. आपला भारत देश महासत्ताकतेकडे यशस्वी वाटचाल करत आहे. इतर देशांशी आपले अनेक करार होत आहेत, वाढत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण त्या देशांशी जोडले जात आहोत.  ह्यावरून आपल्या लक्षात ह्या गोष्टी यायला हव्यात की चालू घडामोडींबद्दल आपण सुज्ञ नागरिक म्हणून कशाप्रकारे जागृत राहायला हवं.

     वरवर जरी हे आंदोलन किंवा चळवळ आक्रमकता व नागरिकांचे रोष वाटत असले तरी प्रत्यक्षात ह्या गोष्टी तिसऱ्या महायुद्धाला आव्हान देणाऱ्या आहेत.  कदाचित 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' षडयंत्राचा एक भागही असू शकतो.   कारण... Third World War has been started...

                                - अनुप्रिया सावंत.

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

5 comments:

  1. मागच्या लेखा प्रमाणेच हा सुद्धा जग तिसऱ्या महायुद्धाच्या विळख्यात कसे गिरफटून गेले आहे हे नेमके मांडले आहेस अनुप्रिया! जेव्हा सामान्य माणूस अन्याया विरुद्ध विरोध करतो तेव्हा त्याची फक्त त्या समाजालाच नाही तर त्या राष्ट्राला , त्याच्या आजूबाजूच्या देशांना ही नोंद घ्यावी लागते..क्रांती अशीच घडते...ह्या लेखातील website links खूपच मार्गदर्शक आहेत.. सर्वसामान्य माणूस युद्धाच्या नावाशी किती अनभिज्ञ असतो हे तर आपण अनुभवतोच..पण असे मार्गदर्शन जर सर्वसामान्य लोकांना मिळाले तर लोकांचीही दिशाभूल होणार नाही..खूप उपयुक्त माहिती आहे... मी नक्कीच माझ्या मैत्रिणींनाही share करीन..Thanks!!

    ReplyDelete
  2. Each write up you are sharing are very informative and they suggest the current situation across world and things are drastically changing. Thanks for sharing. I am glad that I could read

    ReplyDelete
  3. Wonderful article!
    कधीकधी देशाच्या हिता पुढे सर्वसामान्यांनी आपल्या तक्रारी बाजूला ठेवायच्या असतात. पण सातत्याने जेव्हा फक्त सर्वसामान्यांवर सरकार अन्याय करत तेव्हा आंदोलने होतात. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या Yellow Vests आंदोलनाची माहिती तू खूप सुंदर प्रकारे मांडली आहेस.
    तुझ्या लेखातून + तू दिलेल्या references वरुन जाणिव होते की ह्या घटनांचा व्याप फक्त त्या त्या देशापूर्ता मर्यादित राहत नाही.

    ReplyDelete
  4. फ्रान्स मधे घडणाऱ्या दंगलीची सुरवात ही इंधन दरवाढीने झाली असली तरी नंतर कट्टरपंथीय ह्यात सहभागी होतांना दिसत आहेत. ह्यावरून आपण भारतीयांनी एक गोष्ट शिकायला हवी की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव टाकताना काळजी घ्यावी कारण एकदा का कट्टरपंथीय ह्यात घुसले की त्यातून फक्त विध्वंसच निर्माण होतो . देशहीत आणि सर्वसामन्यांचा विचार पूर्णपणे बाजूला राहते.

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.