Thursday 29 November 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक


Image : Pratyaksh Newspaper
     
     आजचा 'बिगर राजकीय दैनिक-प्रत्यक्ष' हा वृत्तपत्र वाचताना त्यातील अमेरिकेतील चेटुकविद्येसंदर्भातील बातमी वाचण्यात आली. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडींवर नियमित अप टु डेट माहिती वाचकांना मिळवून देणारा हा एकमेव दैनिक वृत्तपत्र.

    ब्लॅक मॅजिक आणि थर्ड वर्ल्ड वॉर ह्याचा एकमेकांशी काय संबंध हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेलच.  पण खरंच, ह्याचा संबंध अगदीच आहेच आणि तोही ठराविक समूहामध्ये नसून हे अनेक देशातील कानाकोपऱ्यात घडत असणारे खरेखुरे प्रकार आहेत.  ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे 'अमेरिका'.  होय, उच्चशिक्षित उच्चभ्रू वस्ती असणारा हा प्रगत देश आणि तिथे चालतात ते चेटूकविद्या म्हणजेच ब्लॅक मॅजिक. 

   अमेरिकेत महिषासुराचे मंदिर उभे करण्यासाठी काही कुवृत्तीच्या लोकांनी आपला संघ तयार केला होता.  मात्र त्यालाच विरोध करणारेही तितकेच उपस्थित होते.  ह्या घटना आपल्या भारताबाहेरच्या असल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे कानडोळाच केला.  डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्दा ह्या गोष्टीला कडाडून विरोध केल्याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या.  पण त्याची फारशी गंभीरता नागरिकांना आली नसावी. 

  मात्र आता अमेरिकेसमोरची चिंता दार ठोठावत नसून आत प्रवेश करती झाली आहे. अमेरिकेतील काही संस्थाने ह्यांच्या दाव्यानुसार तसेच प्रत्यक्ष पाहणीनुसार ब्लॅक मॅजिक उपासकांची संख्या ही आठ हजारावरून पंधरा लाखांवर गेली आहे.  कदाचित त्याहीपेक्षा जास्त उपासक असावे, जे अजूनही जगासमोर आली नसतील.  धक्कादायक गोष्ट ह्यापेक्षा मोठी अशी की, ख्रिस्तधर्माशी एकनिष्ठ असणारे सश्रद्ध मंडळीही आता चेटूकविद्येच्या मायाजालात अडकत चालली आहे.

  Third World War is part of New World Order.  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' च्या पद्धतशीर मायाजालात जग अडकत चालले आहे.  कारण 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' (एनडब्लूओ) हे एक कुख्यात अस्पष्ट षड्यंत्र सिद्धांत आहे, ज्यात असे म्हटले आहे की काही शक्तिशाली गट गुप्तपणे जग चालवत आहेत आणि स्वतःची सत्ता स्थापन करू पाहत आहे.

  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हा शब्द नवीन नवीन नाट्यमय गोष्टीत जगाला अडकवून तसेच त्यांना गुलाम बनवून सर्व राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा नाश करण्यासाठी समर्पित गुप्त अभिजाताने वापरला जातो.

    खरं तर फक्त अमेरिका ह्यात अडकली आहे, हा समज चुकीचा आहे.  कारण तिसरे महायुद्धाची पार्श्वभूमी ही न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या रहस्यमय चालीने सुरू झाली आहे.  प्रत्येक देशात काही न काही अचंबित करणाऱ्या आणि अस्थैर्य प्राप्त करणाऱ्या घडामोडी घडतच आहे.

      आपल्या भारतात कधी न होणारी हॉलीविनची पार्टी सुरू झाली आहे.  ऑफिस, कॉलेज, शाळा इतकेच नव्हे तर अगदी ज्युनिअर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्यात सहभागी केले जात आहे.  मुलांना जरी ह्याची गम्मत वाटत असली तरी सुज्ञ आणि सुशिक्षित पालकवर्ग मात्र ह्यात हिरीरीने पुढाकार घेताना आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त कस भुतासारखं दिसता येईल, वेडीवाकडी किळस येणारी वेशभूषा देऊन जिंकविता येईल, ह्यात बेधुंद झालेले पाहण्यास मिळाले. 

     वेशभूषा केल्यामुळे कोणी चेटूक होत नाही किंवा त्याचे साधक होत नाही असे हसत हसत म्हणणारे मात्र नकळत महिषासुराचे साधक बनत आहेत.  माहित नसणे आणि माहित न करून घेणे दोन्ही गोष्टी घातकच आहेत.

     परवा माझी मैत्रीण तिच्या शेजारच्या कुटुंबाची गोष्ट सांगत होती.  मुलीला मूल होत नाही म्हणून अंगात येणाऱ्या बाबाला भेटायला गेले आणि वर्षभरात त्यांना मुल झालं.  त्यासाठी तीन रस्त्याला लिंबू फेकणे, पाठी वळून न बघणे, तसेच एखादा कपडा आणून त्याला होल्स करणे, वैगरे वैगरे गोष्टी होत्या. अशा विविध करणी-मंत्र-तंत्रचा प्रकार केल्यावर त्यांना मिळालेल्या फळामुळे त्यांचा आनंद(?) द्विगुणित झाला आणि नकळत ते चेटूक विद्येचे साधक झाले. 

    अजून अशीच एक साम्य तरीही वेगळी असणारी गोष्ट इथे प्रामुख्याने आठवली.  अमेय इंजिनिअर कॉलेजमध्ये असताना एक तंत्र-मंत्र करणारा साधक अनायासे त्यांच्या ग्रुपला भेटला.  आधीच मार्क सांगतो, पास करतो सांगून घेऊन गेला आणि त्यांचा त्याने स्वतःच्या काळ्या विद्येसाठी बळी दिला.  सश्रद्ध व स्वतःच्या मेहनतीवर तसेच परमेश्वरावर दृढ विश्वास असलेला अमेय मात्र त्यातून बचावला, ते त्या साधकाच्या नादी न लागल्यामुळे.  होय खरंच. परमेश्वर आहेच आणि त्यावर पूर्ण विश्वास आपल्याला कुठल्याही संकटातून सहज बाहेर काढते हे अमेयने अनुभवलं.

     आजकालच्या आपल्या सर्वांनाच सर्व काही झटपट हवं असतं. त्यासाठी गैरमार्गाचा वापर करायलाही काहीवेळेस आपण धजत नाही.   मात्र भक्तीची शिदोरी जवळ असली की सबुरी लाभतेच.  त्यामुळे चुकीच्या गोष्टीपासून रक्षण करण्यास, सद्गुरू आपल्या हाक मारण्याच्या आधीच उभा ठाकतो.   असत्यावर सत्याचा विजय हा नेहमीच असतो.  महिषासुराचा वध हा महिषासुरमर्दिनीकडून होतोच.

     अस्तिकता ही श्रद्धेमुळे येते, श्रद्धा ही भक्तीभावामुळे येते.  भक्तिभाव हा उपासनेतून उत्पन्न होतो.  चांगले कार्य करताना न हाक मारताही परमेश्वर संकटात सोबत असतोच.  मात्र वाईट कर्म करताना रावण त्याचे सर्व बळ एकवटतो, जेणेकरून त्याच्या साधकात भर पडून त्याच्या गुलामांची संख्या वाढेल.

   आज जगात एवढ्या प्रमाणात वाईट गोष्टी घडत आहेत, त्याचे उदाहरण देऊ तितके कमीच.  चॅलेंज घेणे, टिकटोक व्हिडीओ बनवणे, गेम्सच्या आहारी जाऊन स्वतःची मानसिक-शारीरिक हानी करणे, ह्या रोजच्या घडणाऱ्या गोष्टी असल्या तरी 'All Plan Set - एक अस्पष्ट षडयंत्र' प्रमाणे हे सर्व 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' चा एक भाग आहे,  हे आपल्याला आता कळायला हवे.

     आजकालची तरुणाई ह्या सर्व गोष्टी हसण्यावर घेते.  मात्र खरंच प्रत्यक्षात घडणाऱ्या ह्या घटना आणि त्या घटनांचे झालेले बळी ह्यांच्यातुन मात्र तिसरे महायुद्धाचे वादळ उभे ठाकले आहे आणि असुरी न्यू वर्ल्ड ऑर्डर सर्व प्लॅन सेट करत आहे. 

    ह्यातून आपण, प्रत्येक नागरिकाने, समाजाने बोध घेऊन वेळीच सावध व्हायला पाहिजे.  कारण... Third World War has been started...

                                 - अनुप्रिया सावंत.


थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय


थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

2 comments:

  1. स्पष्ट शब्दात मत मांडणे आणि सत्य कितीही टोचत असलं, कितीही बिकट असलं तरीही त्याची जाणीव असणे ही काळाची गरज आहे. सगळं मस्त चाललंय ह्या आंधळ्या विश्वासावर जगणाऱ्या लोकांनी आता तरी जागे होऊन देवाचा, परमेश्वराचा, भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे.आपण अंबज्ञ आहोत की तोह मार्ग आपल्याला सापडला आहे आणि त्या भक्तीच्या झाडाचे लागवड आपल्या घरी आणि पुढच्या पिढीच्या मनात ही झाली आहे.

    ReplyDelete
  2. Anupriya Aditya Sawant तुझे खूप अभ्यासपूर्ण लिखाण ✒️ आणि NWO ची जी तू ज्या साध्या, सोप्या आणि समजू शकेल अश्या शब्दरचनेत ओळख करून दिलेली आहेस त्यामुळे तुझा हा लेख एकदा तरी प्रत्येकाने वाचणे हे बनतेच. तेव्हा अवश्य सर्वांनी हा लेख वाचावा आणि आपल्या इतर मित्र मंडळींना देखील हा लेख वाचायला सांगून नेमके या जगात काय सुरू आहे अथवा आपण जे काही फक्त ट्रेंड, फॅशन आणि लाईफस्टाईल च्या नावाखाली करत आहोत त्याचा नेमका संबंध कशाशी आहे त्याची नेमकी पाश्वभूमी काय आहे हे या लेखातून समजून घ्यावे त्याची तोंडओळख करून घेण्यासाठी हा लेख प्रत्येकाने वाचणे गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येकाने तो अवश्य वाचवा असे मला वाटते.

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.