Tuesday 10 February 2015

कविता #1 - प्रेमाचे भांडण...


 
त्याच्या माझ्यातले भांडण आता नेहमीचेच झालंय.
माझ्या रागाला कारण अनेक बळीचा बकरा मात्र तोच झालंय.

त्याला मनवणे आता मला रोजचेच झालंय,
त्याचे रुसणे मला अजून हवेहवेसे झालंय.

त्याच्या माझ्या प्रेमाचे भांडण असावे हे असेच.
दोघांच्या प्रेमाचे कमळ फुलावे हे असेच.

त्याचं माझ्याशी न बोलणं काही काळ शांत वाटते,
वेळ निघून जाते जशी डोळ्यातून मात्र अश्रू वाहते.

त्याचे मौन माझ्या कानांना सुन्न करत जाते.
त्याच्या माझ्यातली दुरी पाहून त्यालाही पाझर फुटतो.

राहवेना दोघा आम्हा काही क्षणापुरतेही,
त्याच्या माझ्या प्रेमाची नाळ अशी हि जन्माची.

आमच्यातील भांडणं मिटून पुन्हा,
प्रेम दुप्पट वाढते आमचे प्रेम दुप्पट वाढते.
असे हे प्रेम आमचे दोघांचे प्रेम.

         - अनुप्रिया सावंत.

4 comments:

  1. अनुप्रिया दोन जीवांच्या प्रेमाची नाळ भांडणातूनही कशी जुळते ह्याचे खूप छान प्रत्यंतर कविता वाचताना येते... मस्त ....

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.