“When Lessons Beyond the Lesson Plan!…”
संशोधन म्हणजे नक्की काय.. मला या प्रश्नाचं अगदी साधं उत्तर हवं होतं.. जे विचार करताना हळूहळू process होत राहिले...
संशोधन म्हणजे एखाद्या विषयाचा नीट अभ्यास करून नवीन माहिती मिळवणे, समस्या सोडवणे किंवा माहिती बरोबर आहे का ते तपासणे.
सोप्या शब्दात सांगायचं तर, उत्तर शोधण्यासाठी केलेला व्यवस्थित अभ्यास म्हणजे संशोधन.
बस, हे इतकंच असतं.. is it?...
एखादा थिअरी पेपर लिहिताना आपण यात बरेच मुद्दे देऊन ते वाढवू शकतो. पण हेच जेव्हा actual learning मध्ये practical case study करायचं असेल तेव्हा ते कसं करता येईल, याचा एक साधा विचार मनात आला आणि हा साधा नसलेला विचार मला बरंच काही शिकवून गेला.. हीच खरी learning process.. ज्याला आपल्याला ओळखायचं असतं..
ह्यावरच मला एखादी case study कशी असू शकते, ज्याचा विचार करताना आज वेगळंच काहीतरी असं विचारांची frequency अनुभवायला मिळाले.
बऱ्याचदा आपण संशोधन (research) करतो, माहिती गोळा करतो, कारणं शोधतो… पण तरीही शोध घेताना असं वाटतं की आपण प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊन पुन्हा तिथूनच परत येतो. काहीतरी समजतं, दिसतं, पण पूर्णपणे जोडता येत नाही.
ह्याची case study म्हणून विचार करताना काय विचारात घेता येईल?
समजा, इयत्ता आठवीतला एखादा विद्यार्थी मराठी विषयात कंटाळा करतो. त्याला वाचन, लेखन, व्याकरण काहीच आवडत नाही. पण तोच विद्यार्थी हिंदी किंवा फ्रेंच शिकताना मात्र काही प्रमाणात उत्साहाने सहभागी होतो.
तोच मुलगा, तोच मेंदू… मग फरक कुठे पडतो?
हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्याचा नाही, तर शिक्षक म्हणून माझ्यासाठीही आहे.
मला स्वतःला हा प्रश्न पडतो...
माझी शिकवण्याची पद्धत त्याच्यापर्यंत पोहोचते आहे का?
मी विषय जिवंत करते आहे का?
की, कुठेतरी माझ्या आणि विद्यार्थ्याच्या मध्ये एक न दिसणारी दरी तयार होते आहे?
प्रत्येक वेळी शिक्षकच कमी पडतो असं नाही. विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांची आवड, त्यांचा exposure हे सगळं तितकंच महत्त्वाचं असतं. पण तरीही, काहीतरी असं राहून जातं… जे दिसतं, जाणवतं, पण पूर्णपणे connect होत नाही.
आता प्रश्न असा, या case study मध्ये माझा पहिले पाऊल काय असायला हवे?
कदाचित सगळ्यात आधी… स्वतःवर शंका घेणं थांबवणं.
Never doubt yourself. Right?
हे फक्त शिक्षकांसाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे.
मला कोण कसं आणि काय judge करेल याचा विचार सोडणं. Because some things take time.
Back to our case study,
आपण वर्गात कविता शिकवतो, पण विद्यार्थ्यांना त्यात रस वाटत नाही. कारण बऱ्याचदा ते त्यांच्या स्वतःच्या imagination च्या जगात असतात. पुन्हा इथेच एक learning चा gap तयार होतो.
मग ह्यावर उपाय काय?
त्यांना त्यांच्या जगातून सुरुवात करू देणं. Let them think.
“तुझी आवडती कविता कोणती?”
“तुझ्या आजी-आजोबांची आवडती कविता?”
"आईने गायलेले अंगाई गीत?"
“लहानपणीची एखादी आठवण?”
अशा छोट्या गोष्टींमधून विद्यार्थी हळूहळू open होत जातात आणि तिथूनच तो bridge तयार होऊ लागतो.
पण... शिकवताना शिक्षकांना lesson plan हा follow करावाच लागतो. त्यातही सगळ्यात मोठं Time Management. तो एक वेगळा विषय होऊ शकतो.
इथे पुन्हा प्रश्न...
Lesson plan आपणच बनवतो, मग त्या वेळी हे सगळं का नाही सुचत? का नाही होत ठरवल्या plan प्रमाणे? कुठे चुकतंय?
कुठेच नाही! बरोबर!
कारण teaching ही फक्त planning नाही… ती एक live process आहे.
वर्गात गेल्यावर प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी असते.
तेव्हा instant act, decision आणि presence of mind खूप महत्त्वाचं ठरतं.
मग स्वतःलाच एक प्रश्न आपण पुन्हा पुन्हा विचारतो...
“माझ्याकडे lesson plan आहे, माझा scenario clear आहे… तरीही असं का होतं?”
कदाचित उत्तर इतकंच...
Always tell yourself:
Just forget… and focus on actively bridging the gap.
कोणीतरी observe करतंय,
कोणीतरी judge करतंय,
हे सतत चालूच राहणार आहे,
आणि ते दीर्घकालीन प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे.
पण जेव्हा आपण आपल्या दोन्ही भूमिका, teacher आणि learner ह्या मनापासून जगायला लागतो, तेव्हा गोष्टी आपोआप जुळायला लागतात.
कदाचित teaching म्हणजे perfect असणं नाही…
तर प्रत्येक वेळी imperfect असतानाही connect होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं आहे.
And maybe… that is where real learning begins.
- Anupriya Sawant

No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.