'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'.
27 फेब्रुवारी, हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर - थोर कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध. त्यांनी 'कुसुमाग्रज' ह्या टोपण नावाने त्यांचे कवितालेखन केले.) यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे. हा वारसा आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने जपला पाहिजे. आणि तो अखंड सुरू रहावा याच स्फूर्तीने कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.
मराठीचा छंद
मराठीचा गंध,
लाभला वारसा
भारतीय आमुचा जन्म.
बोलतो मराठी
ऐकतो मराठी,
जाणतो मराठी
अभिमान रुपी.
संतसज्जनांनी प्रत्यक्ष
देव जन्मभूमी लाभली,
सर्व त्यागुनी वीरांनी
मराठी मायभूमी घडविलीं.
अनंत ध्येयसक्तींनी
कवीरूपी माय सजली,
नानाविध अलंकार
भूषवित मराठी अवतरली.
सहज सोपी सुंदर भाषा
घेते हृदयी ठाव मनाशी,
अभिमान आम्हा भारतीयांना
गर्जतो मराठी मी मराठी.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- अनुप्रिया सावंत.
खूपच् छान अनुप्रिया
ReplyDeleteखूपच् छान अनुप्रिया
ReplyDeleteमराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteVery nice
ReplyDelete