Friday 24 April 2015

जस्ट स्टार्ट.....

    जस्ट स्टार्ट.....
शाळेला सुट्टी मिळाली म्हणून सगळे भावंडे एकत्र जमलो, कारण होते फॅमिली फंक्शन.  आणि आम्हा सगळ्या भावंडांसाठी धम्माल करायला पुन्हा एक निमित्त.  बऱ्याच दिवसांनी भेटलो म्हणून शाळेतल्या कॉलेजच्या अभ्यासासोबत इतर अनेक कॉम्प्युटर, लॅपटोप, इंटरनेट बद्दलच्या जुन्या नवीन टेक्नोलोजी बद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या.  आमच्या वीत जाण्याऱ्या वेण्णासाठी कॉम्प्युटर घ्यावा कि लॅपटोप ह्या विषयावरून संगणकाचा विषय सुरु झाला तो आम्हा मुलांपासून थेट त्यात आमचे आई, बाबा, काका, काकू, मामा, मावशी असे सगळेच एकत्र सामील झालो.  अर्थात त्यात आजीच्या हाताने बनवलेल्या चहाची आणि उपमाची चव घेत आनंदाने गुजगोष्टी करण्याची धम्मालच वेगळीच.  कोणत्याही विषयात सर्वांच्या सहमतीने एखादी गोष्ट मनापासून वाद-संवादात अनुभवणं ही आमच्या कुटुंबाची खासियत म्हणावी लागेल.  मग त्यात मोठा-छोटा असा कोणी नसतं; सगळ्यांच्याच विचारांना तेवढेच बहुमत.
हल्ली संगणक येणे फार गरजेचे झालेय ना...  प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होतो.  कामे अगदी चुटकीसरशी होतात बघ.  आमच्या काकांच्या वाक्याला दुजोरा देत मामा म्हणाला, हो संगणक हाताळता येणे ही काळाची गरज झाली आहे.  आम्ही परदेशातील कामेही इथे बसल्या जागी करतो.  कॉन्फेरेंस होतात, अनेक महत्वाच्या गोष्टी ह्या लॅपटोपने आम्ही कुठेही बसून करू शकतो.  अर्थात ती गरजच बनली आहे कारण त्यात वेळही वाचतो आणि खर्चही.  तुम्हाला एक गम्मत सांगतो.
परवा आमचा मित्र सुदेश बाहेरगावी शिफ्ट झाला कंपनीच्या प्रोजेक्टसाठी, पण तिथे गेल्यावर त्याच्या आई बाबांना त्याच्याशी संपर्क साधता येईना कारण कॉम्प्युटर तर घरी होता पण त्याचा वापर कसा करणार? चालू करायचा तर तो वापरायचा तरी कसा? आणि जरी वापरला तरी मुलाला पहायचा कसं आणि बोलायचा कसं?  ह्या आणि अश्या अनेक प्रश्नानमध्ये ते भांबावून गेले होते आणि नेमके त्याच वेळेत मी त्यांना सहज भेटायला म्हणून गेलो तेव्हा त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या.  मग मी, सुदेश आणि त्यांची व्हिडीओ कॉन्फेरेंस तर्फे भेट करून दिली.  काय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता!  खूप छान वाटलं त्यांना.  पण खरं कौतुक तर पुढे आहे!
त्यात आमची आजी म्हणाली, कौतुक कसलं रे गोविंदा?  अगं आजी, त्यांनी त्यांचं बोलणं झाल्यावर आम्हाला संगणक शिकवशील का असे विचारले.  काय त्यांचा उत्साह संगणक शिकण्यात, काय सांगू!! मी गेले काही दिवस रोज थोडा वेळ का होईना त्यांना संगणकाबद्दल शिकवायला त्यांच्या घरी जातो आणि तेही तितक्याच आवडीने स्वतः नवीन नवीन शिकण्याचा प्रयास करतात.  खरंच आजी तुला सांगतो, शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो ही म्हण त्या क्षणीच मनाला पटली.
आणि सगळ्यांची उत्सुकता वाढली ती म्हणजे नव्याने पुन्हा विद्यार्थी बनून संगणक शिकण्याची.  सुरुवात तर आमच्या आजीनेच केली.  
गोविंदा मामाला थांबवून आमच्या वेण्णाने त्याला प्रश्न विचारला, संगणक कसा काय चालतो?  तिच्या प्रश्नावर हसत आमचा वीत शिकणाऱ्या प्रथमेशने तो पळतोही अशी तिची गम्मत केली.  आणि पुन्हा एकदा हसत खेळत मामाने शिकवायला सुरुवात केली.
विद्युत प्रवाहाद्वारे संगणकालाही त्याच्या विविध भागांना कार्य करण्यासाठी उर्जा मिळत असते.  विद्युतप्रवाह वाहण्यासाठी सर्व भाग जोडावे लागतात.  आणि त्याद्वारे संगणक कार्यरत होतो.
  • संगणक सुरु वा बंद करणे (स्टार्ट शट डाऊन)
  • संगणक सुरु कसा करायचा?
सर्व प्रथम संगणकाला जोडली गेलेली पिन आपण उचलणार आणि आपल्या संगणकाजवळील बोर्ड कनेक्शनला लावणार म्हणजेच प्रथम संगणकाची पिन जोडणार बटन चालू करणार.
    ती करण्यासाठी खालील आकृती पहा. ह्या पद्धतीने आपण संगणक चालू करणार.
  • त्यानंतर पॉवर बटन दाबून यंत्रणा(सिस्टम युनिट) चालू करणार.


संगणक(कॉम्पुटर) वरील पॉवर बटन



लॅपटोप वरील पॉवर बटन


  • त्यानंतर संगणक चालू होऊ द्यात.
  • जर संगणकाला पासवर्ड म्हणजेच काही संकेतांक दिला असल्यास तो टाईप करा.
         
ती स्क्रीन खालील प्रमाणे दिसेल.
 
पासवर्ड असलेल्या स्क्रीन विंडोचे उदाहरण


  • संगणक सुरु झाल्यानंतर आपल्याला ही खालील प्रमाणे स्क्रीन असलेली विंडो(खिडकी) पाहायला मिळेल.


स्क्रीन                                                         स्क्रीन


आता अश्या प्रमाणे आपला संगणक आपण चालू केलेला आहे. आणि आपल्याला त्याच्यावर असणारी स्क्रीन म्हणजेच विंडो(खिडकी) पाहायला मिळत आहे.  अशी स्क्रीन दिसली कि तुमचा संगणक म्हणजेच कॉम्पुटर सुरु झाला आहे.
आता आपण संगणक/कॉम्पुटर सुरु करायला शिकलो आहोत तर तो बंद कसा करतात हेही पाहूयात.
  • आपला संगणक बंद करायच्या वेळेस संगणकाच्या पडद्यावर डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यास असलेले एक चिन्ह(लोगो) त्यास 'स्टार्ट' बटन असे म्हणतात, त्यावर क्लिक करणे म्हणजेच ते बटन माऊसच्या सहायाने दाबणे.



जर माऊस नसेल तर आपल्या किबोर्डवरील म्हणजे ज्याने आपण अक्षरे टाईप करतो त्यावर सुद्धा आपल्या स्टार्ट बटना सारखे चिन्ह असते, ते दाबावे.


  • त्यानंतर खालील प्रमाणे विंडो दिसेल.  तिथे शट डाऊन ह्या पर्यायावर क्लिक करणे.


संगणक तुम्हाला काही सेकंदाने बंद झालेला दिसेल म्हणजेच मशीन पूर्णपणे बंद होत असताना दिसेन आणि संगणकाच पडदा पूर्ववत काळा झालेला दिसेल.  त्यानंतर मगच तुम्ही तुमचा मुख्य विद्युत पुरवठा, जे तुम्ही संगणकाची पिन जोडल्यानंतर बटन चालू केले होते ते पुन्हा बंद करा.
 अश्या रितेने संगणक पूर्ण बंद होईल.

(लक्षात ठेवण्याजोगे - आपण सिस्टम सेटिंग (पद्धत) बदलून आपल्याला हवे असेल तसे स्क्रीन विंडो (त्यांचे डिझाइन्स) बदलू शकतो.  बाय डीफॉल्ट सगळ्याच सिस्टमवर पद्धत सारखी असते.)


अरे मामा हे बघ आपल्या आजीने काय केले?... काय रे यश काय झाले?  काही नाही रे गोविंदा सहजच तू सांगत होतास ते जमत का थोडं करून पाहत होती.  आजीच्या वाक्याने सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  कारण आज आमच्या लाडक्या आजीने संगणक प्रथमच सुरु केला आणि मामाच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्या प्रमाणे कृती करून उत्तीर्णही झाली.
आजीची ही तप्तरता पाहून सगळ्यांनाच हुरुप आला. आता पुढे मामा काय शिकविणार याची उत्सुकता लागून राहीली. पण ही उत्सुकता जरा ताणून ठेवावी लागली कारण आमचा पाव भाजीचा ब्रेक झाला ना! सो मिलते हे ब्रेक के बाद! पाव भाजी खायला या!!

मागील लेख पुढे पहा

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.