आज खरं तर लेख लिहिण्यापेक्षा मला काहीतरी वेगळं लिहिण्याची ओढ लागली होती. आणि ती समर्पणाची ओढ खऱ्या अर्थाने समर्पण रुपी लेखणीतून उतरली. निमित्त जरी शिक्षक दिनानिमित्त छोटासा भावना व्यक्त करणारा लेख असावा, असे जरी वाटले तरी हे जे समर्पण मांडले गेलंय ते फक्त केवळ त्यांच्याच स्फूर्तीमुळे.
सिखने के लिये सिखाओगे तो सीख पाओगे…
किसी को सिखाने के लिये सिखाओगे तो कभी नही सीख पाओगे!
बघायला गेले तर जणू काही आताच्या काळातली catchy लाईन असावी, जी खऱ्या अर्थाने त्यांच्या निर्मळ शुद्ध भावनेतून, विचारांतून मला जणू कळत नकळत लाभलेली शिकवण असावी आणि हेच समर्पण त्यांनी माझी गुरुदक्षिणा पुष्प म्हणून स्वीकारावे ह्या पेक्षा मोठा आनंद तो काय!
नाटिका: समर्पण
(शिक्षक दिनाचा कार्यक्रम नुकताच संपला आहे. दोन शिक्षिका बेंचवर बसलेल्या आहेत. मुलांनी दिलेली ग्रीटिंग्ज, फुलं आणि सोबतीला हक्काचा चहाचा कप. वातावरण हलकंफुलकं, पण चर्चेला उधाण येणार आहे. पार्श्वभूमीत विद्यार्थ्यांचा गडबडाट आणि हलके स्वरात श्लोक/गाणी ऐकू येत आहेत.)
शिक्षिका १ (हसत, फुलांकडे बघत):
किती गोड ग्रीटिंग्ज दिली आहेत मुलांनी! खरंच, त्यांच्या निरागस डोळ्यातलं प्रेम पाहून मन भरून आलं.
शिक्षिका २ (मस्करीत):
हो ना! ही फुलं आपल्या शिकवण्याला मिळाली आहेत, आपल्या चेहऱ्याला नाही.
(दोघी हसतात. थोडा वेळ शांतता.)
शिक्षिका १ (थोड्या गंभीर स्वरात):
आजचा दिवस नेहमीच विशेष वाटतो. पण मला एक गोष्ट नेहमी हृदयाला स्पर्शून जाते, आपण शिक्षक असूनही अजून शिकतच आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांतून, त्यांच्या उत्सुकतेतून, त्यांच्या निरागस उत्तरांतून… कधीकधी त्यांच्या बंडखोर वृत्तीतून सुद्धा, रोज नवं काहीतरी कळतं.
शिक्षिका २ (मान डोलावत):
हो, अगदी खरं आहे. पण एक गोष्ट नक्की, शिकवणं आणि शिकणं यात फार मोठा फरक आहे.
जो शिकायला तयार असतो, त्याला शिकवणं आपोआप जमतं.
पण जर मनात फक्त 'मी शिकवतेय' एवढंच ठेवलं, तर खरं शिकणं कधीच होत नाही.
'धडा शिकवणं आणि धडा शिकणं', ही जणू दोन टोकं आहेत, पण दोन्ही आवश्यक आहेत.
शिक्षिका १ (उत्सुकतेने):
म्हणजे तुझं म्हणणं काय आहे?
शिक्षिका २ (हळू पण ठाम आवाजात):
सिखने के लिये सिखाओगे, तो सीख पाओगे…
किसी को सिखाने के लिये सिखोगे, तो कभी नही सीख पाओगे!
शिक्षिका १ (विचारात):
म्हणजे?
शिक्षिका २ (शांत स्वरात):
हल्ली बऱ्याचदा आपला अहंकार आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागतो.
आणि आपण चांगल्या गोष्टींपेक्षा चूक कुठे आहे? यावरच जास्त लक्ष केंद्रित करतो.
तिथेच गफलत होते आणि छोटी गोष्ट मोठी होते. हे मला नेहमी खटकतं.
खरं सांगायचं तर – “छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?”
शिक्षिका १ (विचारात):
बरोबर आहे. आपण बरंच काही चुकांमधून शिकू शकतो, पण त्याऐवजी आपण समोरचा कधी चुकतोय? आणि मी त्याला कधी एकदा पकडतोय, यावरच वेळ घालवतो.
कधी आपण एक विचार असाही करतो, “मी मोठी आहे तर माझं ऐकलंच पाहिजे”… किंवा “माझी पोस्ट मोठी म्हणून माझा अहंकार जणू सुखावला पाहिजे”. पण आपण शिक्षक असूनसुद्धा, 'शिक्षक' आहोत हेच विसरतो.
शिक्षिका २ (हसत-उपरोधाने):
हो! आणि कुणी खराखुरा, मेहनती दिसला, तरी आता कौतुकापेक्षा अर्थहीन चर्चाच जास्त ऐकू येतात. आणि हे हल्ली प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते.
एखादी गोष्ट छोटी करून सोडवता येईल का हे बघण्याऐवजी, “समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?” यातच जास्त लक्ष जातं.
मोठेपणाचा अहंकार म्हणजे खरंतर एक मोठ्ठा दगड आहे, ज्यावर आपणच डोकं आपटून घेतो!
(काही क्षण शांतता. शाळेच्या अंगणात लाऊड स्पीकर वर श्लोक चालू आहे , “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः…”)
शिक्षिका १ (थोडं थांबून):
आपल्याला बर्याचदा वाटतं की “मला खूप काही येतं, माझा इतका अनुभव आहे, मी अमुक आहे, तमुक आहे…”
आणि मग समोरच्याचं बोलणं आपण आपल्या सो कॉल्ड EGO वर घेतो.
पण खरं सांगू? जिथे EGO येतो ना, तिथे व्यक्ती म्हणून स्वार्थ नक्कीच शिरतो.
हा EGO म्हणजे अगदी शत्रू! सोयीस्कर चांगल्या गोष्टी विसरतो.
थोडा है थोडे की जरुरत है!
एखादी गोष्ट छोट्या प्रमाणात सोडवली तर झालं असतं, पण नाही… आपल्यातला लपलेला अहंकार दगडासारखा आडवा येतो आणि आपणच त्यावर डोकं आपटून घेतो.
शिक्षिका २ (हसत मंजूर करत):
हो अगदी खरं!
बर्याचदा आपण वेळ घालवतो तो 'समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?' ह्यावर. पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे त्या वेळेत स्वतःला आणि देणाऱ्यालाही काहीतरी चांगलं देणं.
चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या शोधत बसण्यापेक्षा त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे.
शिक्षिका २ (खळखळून हसत):
हो! हल्ली चर्चेचं पीक भारीच आलंय!
कौतुकाचं खतच नाही उरलं म्हणायचं!
शिक्षिका १ (गंभीर होत):
पण मग उपाय काय? आपणही त्यांच्यासारखं करायचं का? की काही गोष्टी NEGLECT करायच्या? पण हे NEGLECT करण्याचंही प्रमाण कसं ठरवायचं?
शिक्षिका २ (संयमाने):
अगं उपाय फार अवघड नाही. जोपर्यंत तुला तुझ्या कामात आनंद मिळतो, तो आनंद फुलाच्या सुगंधासारखा पसरवायचा. शिक्षक म्हणून आपले विद्यार्थी आपल्या शिकवणीतून फक्त धडा शिकणार नाहीत, तर नकळत ते प्रेम, ती आत्मीयता, तो आनंद, शिकण्याची जिद्द आणि प्रेरणा घेऊन जातील. आणि हीच गोष्ट त्या-त्या क्षेत्रातील अगदी प्रत्येकाला लागू होते, बरं का!
शिक्षिका १ (उत्साहाने, डोळ्यात चमक):
वा! म्हणजे लक्ष इतरांवर नाही, तर माझ्या कार्यातून स्वतःला व स्वतःसोबत इतरांना काय चांगलं देता येईल ह्यावर हवं.
म्हणजे... जणू परीस स्पर्शे सोने व्हावे!
शिक्षिका २ (मिश्कील टोनमध्ये):
हो… आणि बाकी लोकांचं?
त्यांचं MUTE BUTTON ऑन करून टाकायचं!
नुसतं दुर्लक्ष नाही, तर त्यांच्या गोष्टींना त्यांच्या जागी ठेवून आपला वेळ आणि उर्जा दोन्ही वाचवायची.
शिक्षिका १ (हसत, डोकं हलवत):
खरंय! शेवटी समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा आपलं काम पूर्ण केल्याची जाणीव होते.
एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद – तीच तर खरी कमाई!
एक व्यक्ती म्हणून समाजाचे लागणारे देणं – हेच तर खरं
समाधान!
शिक्षिका २ (हात जोडत, हसत):
हो… तोच खरा समर्पण!
(दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. मंचावर हलका प्रकाश पसरतो. पार्श्वभूमीत श्लोकाचा आवाज वाढतो. पडदा हळूहळू खाली येतो.)
- अनुप्रिया सावंत
I have come to realize today how deeply you understand good things. Your understanding and sensitivity are truly inspiring.
ReplyDeleteWow! How carefully you have put forth a very sensitive topic and in a very interesting form of writing. A much needed boost to the sincere and genuine teachers and a much needed reflection to the egoistic ones. People should realize everyone makes mistakes but nobody makes one purposely so while pointing out the same, a little empathy can take us all towards a happy, understanding and positive workplace. Happy teachers day Anupriya! Well written. Keep writing and making a difference.
ReplyDelete