Monday, 31 May 2021
मराठी व्याकरण - वाक्य म्हणजे काय?
'Grammar - व्याकरण' सदरा संदर्भात...
- वाक्य म्हणजे काय?(Click Here)
- लिंग(Click Here)
- लिंगाचे प्रकार(Click Here)
Friday, 7 May 2021
थर्ड वर्ल्ड वॉर ८ - चीनचा फास
भारत व युरोपिय महासंघ यांचे व्यापारी सहकार्य अधिक प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या महासंकटातून पूर्ण जगच होरपळून निघत आहेत. त्यात अर्थव्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था असताना भारत मात्र ह्याला पूर्णतः नसला तरी बऱ्याच प्रमाणात अपवाद म्हणायला हरकत नाही.
चीनने जो काही खेळ सुरु केलेला तो चीनच्याच अंगावर उलटायला सुरुवात केव्हाच झाली आहे. युरोपीय महासंघ व्यापारी क्षेत्रात भारतासह करार करण्यास पुढाकार घेण्यास जी सहकार्याला दिसून येत आहे, त्यामुळे चीनचे धाबे नक्कीच दणाणलेले दिसत आहेत. कारण चीनने जे अक्राळ विक्राळ जाळे पसरवले होते ते आता उखडून काढायला चीनच्याच धूर्त खेळीमुळे मदत झाली आहे.
हुवेईवरील बंदीवर चीन आक्रमक भूमिका घेत आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, भारत, स्वीडन अशा १० पेक्षा अधिक देशांनी बंदीची घोषणाही केली. चीनच्या बाजारपेठांचा अगदीच बाजार उठला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्यापारसुद्ध अधिक तीव्र केले आहे. स्वीडीश कंपन्यांना संधी नाकारणे, ऑस्ट्रेलियाचे नैसर्गिक इंधनवायूचे आयात प्रमाण कमी करणे, असे अनेक गोष्टी चीन इतर देशांना कोंडीत पकडण्यासाठी विविध मार्गाने करत आहे. आस्ट्रेलियातून होणारे २९ टक्के फायदेशीर असणारे आयात व्यापार चीनने पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्या ऐवजी चीन तुर्कीशी व्यापार करण्यास उत्सुक दिसत आहे. अर्थात ह्या गोष्टीला त्यापलीकडे जाऊन सबळ कारणे आहेच.
चीन आणि फिलिपाइन्स ह्यांचा साऊथ चायना सी मुद्द्याचा वाद चिघळतो आहे. चीनने आपली मच्छिमार जहाजे फिलिपाइन्सच्या हद्दीत घुसवले होते. चीनचे हे कारनामे विनाकारण नसतात हे एव्हाना त्याच्या ड्रॅगन वृत्तीमुळे जगाला कळत चालले आहे. जशात तसे आणि सतर्कता म्हणून फिलिपाइन्सने सुद्धा घुसखोरीची प्रयत्न उधळवला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साऊथ चायना सी मध्ये 'मिलिटरी हब' उभारण्याच्या त्यांच्या दृढ निर्णयाचा थेट इशाराच चीनला दिला आहे.
क्वाडला (Quad – The Quadrilateral Security Dialogue - QSD) चीनच्या विरोध आहे. बांगलादेशने ह्याला पाठिंबा देऊ नये अन्यथा बांगलादेशचे नुकसान होईल असे चीनने इशारा वजा धमकीच बांगलादेशला दिली आहे. आता ह्या गोष्टीने चीनला बांगलादेशचे कसे आणि काय नुकसान करता येईल ह्याचा अंदाज आपल्याला हळू-हळू का होईना जागतिक घडामोडी बघता नक्कीच लावता येऊ शकेल.
क्वाड आर्थिक व सुरक्षाविषयक संघटना म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे. मात्र भेदरलेल्या चीनला हे कारस्थान वाटतंय. खरंच आहे म्हणा! चीनची खेळी सर्वच जग पूर्णपणे ओळखून आहे.