प्रत्यक्ष - १० वा वर्धापनदिन विशेषांक - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त
'प्रत्यक्ष' ह्या दैनिक वृत्रपत्रास २०१५ च्या दत्तजयंतीच्या शुभमुहर्तावर १० वर्षे पूर्ण झाली. दर दिवशीच्या दैनिक वृत्तांसोबत प्रती वर्षी विशेष लेख असणाऱ्या प्रत्यक्षाची नवीन नवीन संकल्पना काळाच्या बरोबरीने असते. वास्तव्याची ओळख अगदी जवळून करून देणारा प्रत्यक्ष हा एकमेव असा दैनिक आहे, जो इतर राजकीय आणि बिगर राजकीय दैनिकापेक्षा अनेक पटीने वेगळा आहे.
लहान मुलांच्या बुद्धीला चालना व मनोरंजन देण्यापासून ते अगदी तरुणांपासून थेट ज्येष्ठ लोकांपर्यंत उपयुक्त असे हे वृत्तपत्र आहे. जगातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इत्यंभूत खबरी ह्यात असतातच.
यंदाच्या ह्या विशेषांकामध्ये मानवाचे जीवन ते अगदी रहस्यमय आदिवासींच्या जीवनातील वात्सव्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असलेल्या उलाढाली, नैसर्गिक आपत्तीचा तिढा, गोल्डन ट्रेनचे भुयार, अण्वस्राहून भयंकर 'अमली पदार्थ', तियांजीन स्फोट, नेपाळचा धरणीकंप, अमानवी व्यापार, 'मोबाईल बँकिंग' घोटाळे, The Catacombs of Paris ( रहस्यमय ठिकाण), नाझ्का लाईन्स(पेरू) - रहस्यमय ठिकाण, विलक्षण जीवसृष्टी, ट्यूब ट्रान्सपोर्ट ह्या आणि अश्या अनेक विषयांवर सखोल माहिती देणारे, जाणीव करून देणारे व वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला लावणारे विषय आहेत. त्यांची ओळख वाचताना आपल्याला प्रत्याक्षामुळे प्रत्यक्ष होत आहे.
तसेच जॉर्जिया नेशनल अक्वेरिअम, वाळवंटातले मत्सालय, ट्रोपिकल आयलंड रिझोर्ट (जर्मनी) ह्या मानवनिर्मित सौंदर्याची ओळखही ह्यातून होते. फक्त एवढेच न्हवे, तर रोजच्या घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा, उलाढाली ह्यांची वास्तव्यातील घटना कळते. आजच्या जलद युगात अपडेट राहता यावे म्हणून मागच्याच वर्षी 'प्रत्यक्ष' नववर्ष विशेषांक मार्फत 'सोशल मेडिया इश्यू' अंतर्गत ब्लॉग बनवणे, फेसबुक हाताळणे यांचे अतिशय बारकाईने मुद्दे मांडून तसेच ते सर्वांसाठी उपयुक्त व्हावे, प्रत्यक्षात वापरता यावे अश्या सुयोग्य रचनेत सादर केले होते. ह्याही वर्षी नवीन विषय आणि नवीन भेट ह्या संकल्पनेतून सोशल मेडिया दुनियेतील सफर विस्तृतरित्या पुन्हा एकदा घडवली आहे ती - ई-कॉमर्स आणि पेमेंट्स ह्या विषयाच्या सादरीकरणातून.
वरील गोष्टी वाचत असतानाच लक्षात येते कि, "विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त" ह्या प्रत्याक्षाच्या वर्धापन विशेषांकातून अनेक गोष्टी ज्या आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला, पर्यायी आपल्या विश्वात घडत आहेत, त्यांची जाणीव होते. इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर ह्या सारख्या माध्यमातून जगाशी आपण जसे जोडले जात आहोत, तसेच 'प्रत्यक्ष'च्या माध्यमातून डॉक्टर अनिरुद्ध जोशी आपल्याला काळासोबत चालायला खर तर चालवायलाच शिकवत आहेत. ह्या वर्षीच्या विशेषांकमध्ये समाविष्ट केलेल्या गोष्टी जेवढ्या भयावह आणि महत्वाच्या आहेत, तेवढ्याच त्या जनमानसात वास्तव्याची कानउघडणी करणारे आहेत. ह्यातून जगातील घडामोडींच्या बाबतीत स्वतःचे व आपल्या आप्तीयांचे संरक्षण करत मानवाने कसे सतर्क राहायला हवे, ह्याची वारंवार प्रचीती येते.
'दैनिक प्रत्यक्ष' हा आजच्या जीवनाला आणि वास्तविक घडामोडीला साजेशा असा असून त्याचे नियमित वाचन व्यक्तीला वेगळा दृष्टीकोन देते. इतकेच नाही तर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात, स्वतःला ह्या धावत्या जगात सतर्क, अपडेट ठेवण्यास मोलाची कामगिरी बजावतो. प्रत्येकाने वाचावे असे हे दैनिक प्रत्यक्ष नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर जगाला माहिती देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतोच, पण त्याच बरोबर वाचकांना नेहमीच 'वेगळ' देऊन वास्तव्यातील घटनांच्या शैलींचा छटा बारकाईने पाहण्यास शिकवतो आणि हेच प्रत्यक्षचे वैशिष्ट्य आहे.
आध्यात्मिक ते वैज्ञानिक ह्यांची उत्तम जोड 'प्रत्यक्ष'मध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पहायला मिळते. 'प्रत्यक्ष' हा 'आपला मित्र' आहे. काळासोबत चालायचे असेल तर प्रत्यक्षची(आपल्या प्रत्यक्ष मित्राची) साथ ही हवीच.
हीच माहिती हिंदीमधून 'प्रत्यक्ष मित्र' व 'अंबज्ञ' प्रत्यक्ष मधूनही मिळते.
http://www.pratyaksha-mitra.com/
ह्या वेबसाईटला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ह्या 'प्रत्यक्ष' चे महत्व आजच्या घडीला प्रत्यक्षात किती महत्वाचे आहे? ह्याची जाणीव आपसूकच होते. आजच्या जगातील ह्या भीषण वास्तव्याला सामोरे जाण्यासाठी, चला तर मग चालूयात 'प्रत्यक्ष' सोबत...
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.