Saturday 11 April 2015

रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.

       

 माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान.  माणसाच्या आयुष्यातली सगळ्या मोठी गोष्ट आणि शक्ती म्हणजे माणसांची 'विचार' करण्याची पद्धत.

      ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पायाच नसेल त्याच्या आयुष्याची इमारत उभी राहील का बरं? जरी उभी राहिली तरी त्यात ठामपणा असू शकेल काय? जीवनात सुखं, दुखं, यश, अपयश, आशा, निराशा हे प्रसंग चालूच असतात. आपण जीवन जगताना संकटं हि येणारच. संकटांना टाळता येणे जरी शक्य नसले तरी दुखांना टाळता येणे हे नक्कीच शक्य आहे. एकाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली कि विचारांची ताकदही त्याचप्रमाणात बदलत असते. "आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो खरा पण भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते." 

       रक्तदान करणे हे माणुसकीचे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. पण बरेच जन भावनेच्या नादात गैरसमज करून घेतात. रक्त दानाने अशक्तपणा येईल, काहीतरी आजार होईल, किवा इतर अजून काही नाना तर्हेचे विचारे करून घेऊन ते रक्त द्यायला कचरतात. काही जन आपण रक्तदान करतानाचे नाकारले जाऊ म्हणून तिथे जाण्या आधीच घाबरतात आणि मनात खंत करून घेत बसतात. काही जणांना रक्तदान शिबिरावर विश्वास नसतो तर काही रक्तदान शिबीर हॉटेल मधल्या पार्ट्यांचे आश्वासन देवून रक्तदानाच्या नावाने बिझीनेस चा काळाबाजार करतात ह्या नाना तर्हेच्या विचाराने अजूनही आपला समाज रक्तदान करायला पुढाकार घेत नाहीयेत. आपण तिथे रक्त देतो आणि गरजू लोकांना तेच रक्त पैसे देऊन विकत घ्यावे लागते ह्याच भावनेने आज हजारो हाथ पुढे सरसावत नाहीयेत. पण असे नाना-विध विचार करण्यापेक्षा ते पोझीटीव विचार करून शिबिरात सहभागी होत असलेल्या संस्थानची माहिती घेऊन तसेच सरकारी दवाखाने जिथे रक्तदानाची सोय आहे तिथे जाऊन रक्तदान केल्यास ते रक्त नक्कीच चांगल्या कामासाठी गरजूंसाठी वापरले जाते ह्याची १०० टक्के खात्रीच असते. रक्तदानामुळे ते दान कोणाच्या कामी येत असेल तर चांगलाच ना! 

    आज विज्ञान एवढे पुढे सरसावले आहे कि आपल्याला आज विज्ञानामुळे बरेच चमत्कार पाहायला मिळत आहेत. पृथ्वीच्या उत्पत्ती पासूनचे ते वेगवेगळ्या ग्रहांपर्यंतचे, समुद्रातल्या तळापर्यंतचे तसेच यंत्रमानवसारख्या नानाविध गोष्टी विज्ञानाने शोधून काढले आहेत. परंतु अजूनही मानवाला कृत्रीम रक्त तयार करण्यात यश आलेले नाही. हे सत्य एक आव्हाहन आहे आपल्या सगळ्यांसाठीच.

     अपघातामुळे किवा एखादी छोटी शस्त्र-क्रिया करण्यासाठी, किवा कोणत्याहि आजारपणामुळे मानवाला रक्ताची गरज हि दुसर्या व्यक्तीकडून भासतेच कारण हा जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळेच रक्तदानाला विशेष महत्व आहे श्रेष्ठदान म्हणून. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतोय हि भावना खरच खूप सुखावणारी असते. कारण जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम आणि हाच खरं माणुसकी धर्म. एक साधा 'विचार' सुद्धा आयुष्याला नवं चैतन्य देऊन जाते. 'आपण जे पेरतो ते उगवतेच'. 

     "ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे पारणं फेडण्याची संधी म्हणजे रक्तदान".

     आपल्या शरीरात साधारणतः ५ ते ७ लिटर रक्त वाहत असते. आणि रक्तदानाच्या वेळेस त्यातले फक्त ३५० मि.ली. एवढेच रक्त घेतले जाते. पुढील २४ ते ४८ तासात म्हणजे खरं तर १ ते दीड दिवसातच त्याची भरपाई आपल्याला आपल्याच शरीरातून मिळते. आहे कि नाही 'जादू'!!! राक्तादानामुळे आपल्या शरीराची नियमित तपासणी होऊन आपल्याला बऱ्याचश्या आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होते.

रक्तदानासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे:
  • वय वर्ष १८ ते ६० वर्षामधील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते. 
  • रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन हे ४५ किलो पेक्षा जास्त असावे. 
  • हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १२.५ ग्राम टक्केपेक्षा जास्त असावे. 
  • रक्तदात्याने किमान तीन महिने आधी तरी रक्तदान केलेले नसावे. 
  • उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये. 
  • तसेच मलेरिया, कावीळ किवा कोणतीही शस्त्रक्रिया वर्षभरात झालेली नसावी. 
  • इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी. 
  • ब्लड प्रेशर लो किवा हाय असणार्यांनी रक्तदान करताना त्याची चाचणी करून पहावी. 
   
     कोणत्या कारणास्तव आपल्याला रक्त देण्यासाठी नाकारले गेले तरी त्यावर तर्क वितरक करू नये. बर्याचवेळेस हिम्बोग्लोबिंच्या प्रमाणाचा अभाव असल्यामुळे त्या व्यक्तीचे रक्त घेत नाहीत. हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित आहार सेवनाने विकासात करता येते. सत्कार्याचा विचार मनात येणे हेही नसे थोडके.

     चला तर मग आहात ना सज्ज..... रक्तदानाची अमुल्य भेट देण्यासाठी.
                                                                                             
                                                                                                                 -  अनुप्रिया ठोंबरे सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.